Goa Heavy Rain Dainik Gomantak
गोवा

अतिवृष्टीचा बळीराजाला फटका! 3.70 कोटींचे नुकसान; भरपाईसाठी 2,453 शेतकऱ्यांचे अर्ज

Goa Heavy Rain: नुकसानीची पाहणी केली असता ७४० हेक्टर क्षेत्रफळातील शेतीचे नुकसान झाल्याचे दिसून आले

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी, ता. ८ : राज्यात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नद्यांना पूर आला, अनेकांची घरे कोसळली, दरडी कोसळून जनजीवनही विस्कळीत झाले. या पावसामुळे बळीराजाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

राज्यातील कृषी कार्डधारक व इतर मिळून सुमारे २,४५३ शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी अर्ज केले असून नुकसानीचा आकडा सुमारे ३ कोटी ७० लाख असल्याची माहिती कृषी संचालक संदीप फळदेसाई यांनी दिली.

राज्यातील भातशेती पाण्याखाली गेली तसेच इतर पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना गणेश चतुर्थीपूर्वी भरपाई देण्याचे आश्‍वासन दिले होते.

त्या अनुषंगाने कृषी संचालनालयाने राज्यातील नुकसानीची पाहणी केली असता, ७४० हेक्टर क्षेत्रफळातील शेतीचे नुकसान झाल्याचे दिसून आले.

पावसामुळे झालेले शेतकऱ्यांचे नुकसान

कृषीकार्डधारक शेतकरी

आलेले अर्ज - क्षेत्रफळ हेक्टर - रक्कम

सांगे - ३२ - १७.३७ - २०७८०००

मडगाव - २००- ३५.५१. - १४२०४७६

केपे - ९२ - ५.८५ - ४५४६००

फोंडा - १२३ - ४५ - २००४८००

डिचोली - १७० - ७९.४५ - २७५७८८०

म्हापसा - ८०० - २२५ - ५९०००००

धारबांदोडा - २७ - ९.५७ - ११९५५००

तिसवाडी - १६१ - ५२.५- १४४९४००

काणकोण - ४४ - ८.५ - ६०००००

साखळी - १०९ - ५८.५६ - २७७१८००

वाळपई - २५५ - ३८ - ६७०००००

पेडणे - १४१ - ६२.१६५ - १६२९४४००

मुरगाव - ५२ - ११.१८ - ४४७२००

कृषीकार्ड नसलेले शेतकरी

आलेले अर्ज - क्षेत्रफळ हेक्टर - रक्कम

मडगाव - ३५ - ५.२२ - २०८८०८

केपे - ८ - ०.४७ - ३०५००

फोंडा - १२१ - ३४ - १३६००००

डिचोली - ३३ - ६.४ - २८५०००

म्हापसा - १५० - २५.३७५ - ९७००००

धारबांदोडा - २ - ०.८० - ७२००

तिसवाडी - ३० - ३.९८ - १६०४००

साखळी - ५ - ७ - २५००००

वाळपई - ५ - ०.३ - ४००००

पेडणे - ३ - ०.६६ - २६४००

मुरगाव - ५५ - ८.९८ - ३५९२००

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT