Rainfall
Rainfall Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon Update: राज्यात शुक्रवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्यात शुक्रवारी (दि.15) तुरळक ठिकणी मुसळधार पावसाची शक्यता गोवा हवामान खात्याने वर्तवली आहे. दक्षिण तसेच उत्तर गोव्यात गुरूवारी आणि शुक्रवारी (15 व 16 सप्टेंबर) मुसळधार पाऊस पडेल असे हवामान खात्याने (Weather Update, Goa) म्हटले आहे. 17, 18, 19 सप्टेंबर रोजी हवामान खात्याकडून कोणताही इशारा देण्यात आलेला नाही.

गोव्यात दक्षिण-पश्चिम मान्सून सक्रिय आहे. गोव्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली आहे. म्हापसा, वाळपोई, केपे तसेच, पेडणे, फोंडा, साखळी, काणकोण, मडगाव आणि सांगे परिसरात मागील काही दिवसांत तुरळक पावसाची नोंद झाली आहे.

गोवा हवामान खात्याने जारी केलेला यलो अलर्ट शुक्रवारी देखील कायम ठेवला असून, मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Loksabha Election 2024 : दोन्‍ही जागा ‘इंडिया’च जिंकणार! विरियातो फर्नांडिस

Siolim News : देशाच्या अधोगतीस काँग्रेस जबाबदार : मुख्यमंत्री प्रमोद सावंत

Goa News : राज्यात ७० टक्क्यांहून अधिक मतदान अपेक्षित! सदानंद शेट तानावडे

Crime News : काणकोणात बारचालकाचा संशयास्पद मृत्यू; मृतदेहाजवळ गावठी बॉम्ब, काडतुसेही सापडल्याने तर्कवितर्क

Santhacruz Health Centre : सांताक्रुझ येथील शहरी आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडा; रुग्णांना मारावे लागतात हेलपाटे

SCROLL FOR NEXT