Crime News : काणकोणात बारचालकाचा संशयास्पद मृत्यू; मृतदेहाजवळ गावठी बॉम्ब, काडतुसेही सापडल्याने तर्कवितर्क

Crime News : सकरेव्हाळ येथील बार ॲण्ड रेस्टॉरंट विल्सन यांनी चालवायला घेतला आहे. शनिवारी रात्री ११ वाजता बार बंद करून ते घरी जाण्यासाठी निघाले. उत्तररात्री साडेतीनच्या सुमारास बारमधील एका वेटरने बारमालकाला जागवून विल्सन रस्त्याच्या कडेला पडले असल्याचे सांगितले.
Crime News
Crime NewsDainik Gomantak

Crime News :

काणकोण, पणसुले येथील विल्सन फर्नांडिस यांचा मृतदेह सकरेव्हाळ येथे निर्जनस्थळी संशयास्पद अवस्थेत रविवारी पहाटे आढळला. या परिसरातच गावठी बॉम्ब आणि काही काडतुसेही सापडली आहेत. त्यामुळे त्यांच्या मृत्यूबाबत तर्कवितर्क व्यक्त केला जात आहे.

सकरेव्हाळ येथील बार ॲण्ड रेस्टॉरंट विल्सन यांनी चालवायला घेतला आहे. शनिवारी रात्री ११ वाजता बार बंद करून ते घरी जाण्यासाठी निघाले. उत्तररात्री साडेतीनच्या सुमारास बारमधील एका वेटरने बारमालकाला जागवून विल्सन रस्त्याच्या कडेला पडले असल्याचे सांगितले. घटनास्थळी गेल्यानंतर बारमालकाला विल्सन रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. त्यांना काणकोण आरोग्य केंद्रात हलविले.

Crime News
PM Modi's Goa Visit: PM नरेंद्र मोदींच्या सभेला जाणार असेल तरच प्रवेश; सांकवाळमध्ये वाहतुकीत मोठा बदल

मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. विल्सन यांचा मृत्यू

कशामुळे झाला हे अद्याप कळलेले नाही. फॉरेन्सिक पथकाने पोलिसांसमवेत घटनास्थळी तपासणी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com