Siolim News : देशाच्या अधोगतीस काँग्रेस जबाबदार : मुख्यमंत्री प्रमोद सावंत

Siolim News : दांडा -शिवोली येथील श्रीजागरेश्वर देवस्थानच्या सभागृहात आयोजित प्रचार सभेत मुख्यमंत्री बोलत होते.
Siolim
SiolimDainik Gomantak

Siolim News :

शिवोली, स्वातंत्र्यानंतर चार पिढ्या पंतप्रधानपदाच्या खुर्चीत चिकटून बसलेल्या नेहरू-गांधी घराण्याने देशासाठी काय केले ते समोर येऊन सांगावे. कॉंग्रेसकडे जनतेला सांगण्यासारखे आणि देण्यासारखे काहीच राहिलेले नाही, उलट देशाच्या अधोगतीस कॉंग्रेसच जबाबदार आहे.

त्यामुळे देशाचा सार्वभौम विकास आणि प्रगती साधण्यासाठी भाजपला भरघोस मतदान करून श्रीपाद नाईक यांना उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून सहाव्यांदा विजयी करण्याचे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शिवोलीत केले.

दांडा -शिवोली येथील श्रीजागरेश्वर देवस्थानच्या सभागृहात आयोजित प्रचार सभेत मुख्यमंत्री बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर शिवोलीच्या आमदार दिलायला लोबो, कळंगुटचे आमदार मायकल लोबो, माजी मंत्री दयानंद मांद्रेकर, शिवोलीच्या जि.प. सदस्य सनिशा तोरस्कर, मार्ना-शिवोलीचे सरपंच अभय शिरोडकर, उपसरपंच मनोरमा गोवेकर, शिवोली भाजप मंडळाचे अध्यक्ष मोहन दाभाळे आदी उपस्थित होते.

Siolim
Goa Apple Trees : गोव्यातही बहरणार सफरचंदाची झाडे; पहिल्या प्रयोगाला यश

सडये येथेही सभा

रविवारी सायंकाळी सडये पंचायत क्षेत्रातील श्री साखळेश्वर देवस्थानच्या आवारात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भाजप उमेदवार श्रीपाद नाईक यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. यावेळी सडयेंच्या सरपंच दीपा पेडणेकर, उपसरपंच नीलेश वायंगणकर, इतर पंचायत सदस्य तसेच मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.

शिवोलीच्या आमदार दिलायला लोबो यांनी स्वागतपर भाषण केले. भाजपचे माजी मंडळ अध्यक्ष नारायण मांद्रेकर यांनी सूत्रसंचालन केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com