Loksabha Election 2024 : दोन्‍ही जागा ‘इंडिया’च जिंकणार! विरियातो फर्नांडिस

Loksabha Election 2024 : सरकारकडून जनतेची लूट; सांगेत प्रचाराचा झंझावात
Viriato Fernandes
Viriato FernandesDainik Gomantak
Published on
Updated on

Loksabha Election 2024 :

सांगे, केंद्रातील मोदी सरकारने जनतेला पंधरा लाख रुपये देण्याचे वचन दिले होते. ते पूर्ण न करता जीएसटीच्या नावाने लोकांच्‍या खिशातूनच पैसे काढले. जनतेला बॅंक खाती खोलण्याची सूचना केली. सध्‍या ही खाती रिक्त पडून आहेत.

हे सरकार जनहितविरोधी असून, यावेळी गोव्‍यातील दोन्‍ही जागा ‘इंडिया’ आघाडीच जिंकेल, असा विश्‍‍वास दक्षिण गोव्‍यातील काँग्रेसचे उमेदवार कॅप्‍टन विरियातो फर्नांडिस यांनी व्‍यक्त केला.

मळकर्णे-सांगे येथील कोपरा बैठकीत फर्नांडिस बोलत होते. काल त्‍यांनी सांगे विधानसभा मतदारसंघाचा दौरा केला. या दौऱ्यात आपल्‍याला चांगला प्रतिसाद मिळाला, असेही त्‍यांनी सांगितले. यावेळी त्‍यांच्‍यासमवेत दक्षिण गोवा काँग्रेस अध्यक्ष ज्युलिओ डिकॉस्‍टा, जितेंद्र नाईक,

मळकर्णेचे पंच फ्लेझर डिकॉस्‍टा, टोनी कार्दोझ, जुजेफिन फर्नांडिस, इनासियो रॉड्रिगीस, पुरसो गावकर, रिमेडियस फर्नांडिस, फ्रान्‍सिस रॉड्रिगीस, चंदा वेळीप, रॉक पाशेको, रजनीकांत नाईक, डायगो फर्नांडिस, मेसेलीदिस फर्नांडिस, फ्रान्‍सिस रिबेलो, जुझे आफोन्सो आणि कार्यकर्त्यांची उपस्‍थिती होती.

सांगे मतदारसंघाच्या प्रचार दौऱ्याला प्रारंभ करताना कॅ. विरियातो फर्नांडिस यांनी प्रथम जांबावली येथील श्री दामोदर देवाचे दर्शन घेतले. त्यानंतर मळकर्णे येथील श्री मल्लिकार्जुन देवाचा आशीर्वाद घेतला.

रिवण, केरी येथे कोपरा बैठकाही घेतल्‍या. यावेळी त्यांच्यासोबत जुझे आफोन्‍सो, टोनी कार्दोझ, प्रदीप नाईक, बोस्त्यांव सिमॉईश उपस्‍थित होते. रिवण बाजार व परिसरातील मतदारांच्या गाठीभेटी घेऊन विरियातो यांनी आपल्याला संधी देण्याचे आवाहन केले.

अशा सरकारवर विश्‍‍वास ठेवायचा का?

वाडे-कुर्डी येथील बैठकीलाही चांगला प्रतिसाद लाभला. यावेळी कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी कृषी विषयावर भर देत सरकार काजू उत्पादकांना न्याय देऊ शकले नाही असा आरोप केला. साळवली धरणग्रस्त बांधवांचे ऊस उत्पादन हाच मुख्य आर्थिक स्रोत असताना शेतकऱ्यांचा आर्थिक कणा मोडून काढण्याचे काम सरकारने केले आहे.

खाण विषयावर केवळ आश्वासने देण्यात आली. अशा सरकारवर जनता विश्‍‍वास ठेवणार काय? यावेळी देशात ‘इंडिया’ आघाडीचे सरकार येणार ही काळ्‍या दगडावरची रेघ आहे, असा विश्‍‍वासही त्‍यांनी व्‍यक्त केला.

गोव्‍याला खास दर्जाचे आश्‍‍वासन कोठे विरले?

उगे-सांगे येथे बोलताना विरियातो म्‍हणाले, २०१४ साली मेरशी येथे नरेंद्र मोदींनी वचन दिले होते की पंतप्रधान झालो तर गोव्याला खास दर्जा देणार म्‍हणून. कोठे विरले हे आश्‍‍वासन? काळा पैसा कुठे गेला? गोव्‍यातील काही मंत्री तर सोने तस्‍करीत गुंतलेले आहेत. अशा सरकारला आता जनताच चांगली अद्दल घडविणार आहे असे सांगून आता यापुढील सर्व आयुष्‍य गोमंतकीयांच्या हितासाठी व्यथित करणार आहे, असे ते म्‍हणाले.

Viriato Fernandes
Goa Drug Case: तळघरात गांजाची लागवड; बोरीत तरुणाला अटक, 8.50 लाखांचे अमली पदार्थ जप्त

७ मे हा दिवस मतदानाचा असला तरी खऱ्या अर्थाने तो दुसरा ‘ओपोनियन पोल’ ठरणार आहे. राज्‍यातील शेतीभातीची विक्री केली जात आहे. त्‍यामुळे भावी पिढीसाठी गोवा राखून ठेवण्याकरिता आज प्रत्येक गोमंतकीयाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्‍या मालाला भाव दिला जात नाही. संजीवनी साखर कारखाना बंद पडला आहे. भाजप सरकार जनहितविरोधी आहे.

- कॅ. विरियातो फर्नांडिस, काँग्रेसचे उमेदवार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com