Santhacruz Health Centre : सांताक्रुझ येथील शहरी आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडा; रुग्णांना मारावे लागतात हेलपाटे

Santhacruz Health Centre : : खासगी फार्मसीमधून खरेदी करण्याची वेळ; या केंद्रात दिवसागणिक सुमारे दीडशेहून अधिक रुग्ण तपासणी तसेच इतर उपचारासाठी उपस्थिती लावतात.
Medicine
Medicine Dainik Gomantak
Published on
Updated on

Santhacruz Health Centre :

पणजी,सांताक्रुझ येथील शहरी आरोग्य केंद्रामधील फार्मसीमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून औषधांचा तुटवडा भासू लागला आहे. केंद्रात तपासणीसाठी आलेल्या रुग्णांना देण्यात आलेली औषधे फार्मसीमध्ये उपलब्ध नसल्याने खासगी फार्मसीमधून खरेदी करण्याची वेळ येत आहे.

सामान्य रुग्णांना ही औषधे खरेदी करणे आवाक्याबाहेर असल्याने त्यांच्यात नाराजी आहे. औषधांच्या या तुटवड्याबाबत तेथील काही डॉक्टरांनी नाव उघड न करण्याच्या अटीवर माहिती दिली. त्यामुळे येथील फार्मसीमध्ये औषधे लवकर उपलब्ध करण्यात यावीत अशी मागणी रुग्णांकडून होत आहे.

ताळगाव व सांताक्रुझ मतदारसंघातील लोकांसाठी सांताक्रुझ येथे शहरी आरोग्य केंद्र आहे. या केंद्रात तपासणीसाठी असलेल्या डॉक्टरांची संख्या पुरेशी आहे. या केंद्रात दिवसागणिक सुमारे दीडशेहून अधिक रुग्ण तपासणी तसेच इतर उपचारासाठी उपस्थिती लावतात.

Medicine
Goa Politics: 'काला धन' भाजपकडेच आहे, मोदींनी गोव्यातील सभेत अधिकृतपणे घोषणा करावी; अमित पाटकर

या केंद्रात तपासणीनंतर आरोग्य खात्यातर्फे देण्यात येणाऱ्या मोफत औषधांची यादी डॉक्टर देतात व त्यानंतर रुग्ण ती तेथीलच औषधालयातून औषधे घेतात. या केंद्रात उपचार, रक्ततपासणी तसेच जखमांची ड्रेसिंग आदी सोय आहे मात्र या केंद्राकडे रुग्णांचा ओढा असल्याने औषधांचा तुटवडा वारंवार भासत आहे.

या केंद्रातून औषधांचा साठा पुरवठा करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात येतो मात्र किचकट प्रक्रियेमुळे त्याला उशीर होतो. त्यामुळे रुग्णांना मोफत औषधांपासून वंचित रहावे लागते, अशी माहिती एका रुग्णांच्या नातेवाईकाने दिली.

निवडणूक आचारसंहितेमुळे विलंब !

या औषधांच्या तुटवड्यासंदर्भात तेथील काही डॉक्टरांशी विचारपूस केली असता मोफत औषधांचा फार्मसीमध्ये तुटवडा आहे. ती लवकरच उपलब्ध करण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे. सध्या आचारसंहिता लागू असल्याने व कर्मचारी निवडणूक कामाला असल्याने त्या प्रस्तावाला मंजुरी देण्यासाठी विलंब झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी माहिती दिली.

रुग्णांची गैरसाेय

गरीब व सामान्य लोक या केंद्रात उपचारासाठी येत असल्याने मोफत मिळणारी महागडी औषधे खासगी फार्मसीतून खरेदी करणे त्यांना शक्य होत नाही. त्यामुळे ताळगावबरोबरच सांताक्रुझ परिसरातील रुग्ण वारंवार आरोग्य केंद्रात हेलपाटे मारताना दिसत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com