Mumbai Goa Highway
Mumbai Goa Highway Dainik Gomantak
गोवा

Mumbai Goa Highway Traffic: रत्नागिरीत धो धो! परशुराम घाटात रस्त्यावर चिखल; मुंबई-गोवा महामार्गावर पहाटे पाचपासून ट्रफिक जाम

Pramod Yadav

Mumbai Goa Highway Traffic Jam: गोवा आणि महाराष्ट्रात आज पहाटेपासून विविध ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. सकाळी महाराष्ट्रात कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रात विविध भागात जोरदार पाऊस पडला.

रत्नागिरीत देखील मोठा पाऊस पडल्याने चिपळूण येथील परशुराम घाटात भरावाचा चिखल रस्त्यावर आला आहे. त्यामुळे या मार्गावर मोठी वाहतुक कोंडी झाली आहे.

मुंबई-गोवा महार्गावर सकाळी पाच वाजल्यापासून वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या असून, प्रवासी ताटकळत थांबले आहेत.

सकाळपासून रत्नागिरीत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे मार्गालगत असलेली भरावाची माती परशुराम घाटात रस्त्यावर आली असून, चिखल झाला आहे. त्यामुळे मार्गावरील वाहने जागच्या जागी थांबली आहेत. सकाळपासून या मार्गावर मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना प्रवासी आणि वाहनधारक करत आहेत.

तसेच, खेड आणि चिपळूण दोन्ही दिशेला मुंबई गोवा महामार्गावर ती आठ ते दहा किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. दरम्यान, घाटातील चिखल बाजुला करण्यासाठी अजून काही अवधी लागण्याची शक्यता आहे.

या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विलंब लक्षात घेऊन प्रवास करावा अशी सूचना सध्या करयण्यात येत आहे. दरम्यान, शेकडो विविध प्रकारची वाहने अडकून पडल्याने वाहतूक चिरणे मार्गे वळवण्याचे प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.

येत्या दोन दिवसात गोवा आणि महाराष्ट्रातील विविध भागात पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. काल दोन्ही राज्यात बहुतेक ठिकाणी ढगाळ वातावरण होते. तर, आज सकाळी अनेक भागात पावसाने हजेरी लावली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT