Goa Monsoon 2024 Dainik Gomantak
गोवा

अवघ्या तासातच आला वाळवंटी नदीला पूर; रस्त्यांना नदीचे स्वरुप, वाळपईसह साखळीला पावसाने झोडपले

Goa Monsoon 2024: सत्तरीत पावसाने हाहाकार माजवला असून, रस्ते जलमय झाले आहेत.

Pramod Yadav

Goa Monsoon 2024

डिचोली: सत्तरी तालुक्यासह साखळी परिसराला आज (सोमवारी, ०२ सप्टेंबर) सकाळपासून पावसाने झोडपून काढले. त्यामुळे पूरसदृश स्थिती निर्माण झाली. वाळपई बाजारात पाणी घुसल्याने विक्रेत्यांचे नुकसान झाले.

दुपारनंतर पावसाचा जोर आणखी वाढला. अवघ्या एका तासाभरात पडलेल्या मुसळधारपावसाचा जोर एवढा प्रचंड होता की, वाळपईबरोबर होंडा भागातील रस्ते पाण्याखाली गेले.

सत्तरीत पावसाचा हाहाकार (Sattari Rain Viral Video)

सत्तरीत पावसाने हाहाकार माजवला असून, रस्ते जलमय झाले आहेत. अनेक ठिकाणी पाण्याचे मोठे लोंढेच्या लोंढे आल्याने अनेक वाहने अडकून पडली. एका दृष्यात चारचाकी अडकून पडल्याचे दिसत असून, कारच्या दोन्ही बाजुने मोठ्या प्रमाणात पाणी जात असल्याचे दिसत आहे. तर, दुसऱ्या व्हिडिओत एक दुचाकी चालक पाण्याच्या प्रवाहात अडकून पडला आहे.

वाळपई हनुमान मंदिर परिसरात असलेल्या शेडमध्ये गटारांतील पाणी शिरले. तसेच व्यापाऱ्यांच्या दुकानात पाणी जाऊन त्यांचे सामान वाहून गेले. वेळूस, म्हादई, रगाडा तसेच वाळवंटी नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढली.

सध्या चतुर्थीचे दिवस असल्यामुळे नागरिकांना या पावसाचा मोठा फटका बसत आहे. आज दुपारी शाळा सुटण्याच्या वेळी मोठा पाऊस पडत होता. त्यामुळे शाळकरी मुलांसह इतरांनासुद्धा भर पावसात भिजत जाण्याची वेळ आली.

तसेच वाळपई, होंडा बाजार, होंडा गावकरवाडा, नारायणनगर, होंडा नवनाथ मंदिर आदी परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी भरून काही ठिकाणी घरांत, दुकानांत पाणी भरण्याची घटना घडली.

घरे, दुकानांमध्ये पाणी शिरल्याने पंचाईत

गावकरवाडा-होंडा येथे वसंत गावस यांच्या घरामध्ये पाणी भरून नुकसान झाले. तसेच होंडा बाजारातील व्यापाऱ्यांनाही या पावसाचा मोठा फटका बसला.

अवघ्या तासाभरात पडलेल्या पावसाचे पाणी एवढे वाढले की, होंडा स्टेट बँकमध्ये पाणी भरले. त्यानंतर काही वेळात पावसाचा जोर कमी झाल्यामुळे पाण्याची वाढलेली पातळी कमी झाली. चोर्लाघाट, बाराजण-सत्तरी आदी ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या.

अवघ्या तासातच वाळवंटीला पूर

साखळी आणि परिसराला आज सोमवार, २ सप्टेंबर रोजी दुपारी १.३० वा. नंतर पावसाने अक्षरशः झोडपून काढले. दीड वाजेपर्यंत शांतपणे वाहणाऱ्या वाळवंटी नदीला अवघ्या तासातच पूर आला. ३ वाजेपर्यंत वाळवंटीतील पाणी पात्राबाहेर वाहू लागले.

तर काहीच वेळाने वाळवंटी नदीकाठच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. भरती ओसरल्यानंतरही वाळवंटीला पूर आला आहे. डोंगरमाथ्यावर जोरदार पावसाची वृष्टी चालूच असल्याने साखळीत पूरस्थिती उ‌द्भवली आहे.

सोमवार हा आठवडी बाजाराचा दिवस असल्याने या जोरदार पावसाचा बाजारावरही परिणाम झालेला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG: कशाला घाई केली मित्रा...! Shubman Gill चा स्वतःच्या पायावर धोंडा, भडकला गौतम गंभीर; टीम इंडिया अडचणीत

Goa Assembly: आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेवरुन आलेमाव बरसले, 'सत्तरी' पॅटर्नवर उपस्थित केले सवाल; वाचा दिवसभरातील घडामोडी

IND vs ENG: इंग्लंडमध्ये केएल राहुलचा जलवा, करिअरमध्ये पहिल्यांदाच नोंदवले 'हे' 3 मोठे रेकॉर्ड; लवकरच गावस्करांनाही सोडणार मागे!

महात्मा गांधी म्हणाले होते 'दारु सोडा', अवैध मद्य तस्करीवरुन विजय सरदेसाईंनी दिले PM मोदींच्या गुजरातचे उदाहरण

Viral Video: आजीबाईचा 'स्वॅग'च निराळा! सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय तूफान व्हायरल; तुम्ही पाहिलाय का?

SCROLL FOR NEXT