Goa Monsoon Update Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon Update: राजधानीला परतीच्या पावसाने झोडपले

राज्यातल्या मॉन्सूनला परतीचे वेध लागले आहेत. या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या वादळसदृश्य परिस्थितीमुळे आज राजधानी पणजीला पावसाने झोडपून काढले.

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यातल्या मॉन्सूनला परतीचे वेध लागले आहेत. या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या वादळसदृश्य परिस्थितीमुळे आज राजधानी पणजीला पावसाने झोडपून काढले. कमी वेळेत होणारा (इंटेन्स रेन) पाऊस आज झाला. विजेच्या कडकडाटासह पणजीकरांनी चारच्या सुमारास मुसळधार पाऊस अनुभवला.

(Heavy rain in Panaji today due to storm-like conditions)

गोवा वेधशाळेचे वैज्ञानिक एम. राहुल म्हणाले की, राज्यात सरासरी 15ऑक्टोबरच्या दरम्यान मॉन्सूनचा परतीचा पाऊस सुरू होतो. यावर्षी मॉन्सूनचे आगमन आणि परतीचा पाऊसही उशिरा परतत आहे. येत्या दोन दिवसांत मॉन्सून राज्यातून माघार घेईल. यामुळेव वादळसदृश पावसाचा अनुभव येत आहे. ही स्थिती उद्या आणि परवा राहील.

राज्यातील पावसाचा जोर गेल्या 24 तासांत कमी झाला होता , मात्र 21 पर्यंत राज्यात पावसाची शक्यता गोवा वेधशाळेद्वारे वर्तविण्यात आली आहे.

तापमानात वाढ झाली असून पणजी येथे कमाल 32.4 अंश सेल्सिअस तर किमान 24.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

मंगळवारपासून उत्तर अंदमान समुद्र आणि शेजारच्या परिसरात चक्रीवादळाचे परिवहन आहे. सरासरी समुद्रसपाटीपासून 3.1किमी पर्यंत पसरले आहे,

त्याच्या प्रभावाखाली, पुढील 24 तासांत दक्षिणपूर्व आणि लगतच्या पूर्वमध्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे.

मध्य बंगालच्या उपसागरावर 22 ऑक्टोबर रोजी सकाळी पश्चिमेकडे सरकण्याची आणि कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. पुढील 48 तासांत पश्चिममध्य बंगालच्या उपसागरात ते आणखी तीव्र होऊन चक्रीवादळ बनण्याची शक्यता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa Live Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

SCROLL FOR NEXT