Panaji Monsoon Update Dainik Gomantak
गोवा

Panaji Monsoon Update: पणजी-ताळगावात मुसळधार पाऊस! पुढील 12 तास IMD तर्फे सतर्कतेचा इशारा

रस्ते तुंबण्यास सुरुवात

दैनिक गोमन्तक

Panaji Monsoon Update: राजधानी पणजीमध्ये सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून पणजी शहर आणि नजीकच्या भागामध्ये पाणी तुंबण्यास सुरुवात झाली आहे. मागील काही तासांपासून पावसाची संततधार सुरूच असून यामुळे ठिकठिकाणी रस्ते पाण्याने भरले असल्याचे चित्र दिसून आले आहे.

नागरिकांना सतर्कतेचा इशारा...

यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे, असा इशारा हवामान खात्यातर्फे वर्तवण्यात आला आहे. तर दुसरीकडे घाट भागात दरडी कोसळण्याचे प्रमाणही वाढले असून फोंडा, पेडणे, मुरगाव तसेच सासष्टी या भागात दरड कोसळण्याची शक्यताही वर्तवण्यात आलेली आहे.

सध्याची पावसाची परिस्थिती पाहता पुढील बारा तास हवामान खात्यातर्फे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

इथे पहा व्हिडिओ....

8 जुलैपर्यंत मुसळधार पाऊस

गोव्यात 8 जुलैपर्यंत मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज गोवा वेधशाळेने वर्तवला आहे. उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा या दोन्ही जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मध्यम पाऊस ते अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.

दोन्ही जिल्ह्यातील काही भागांमध्ये काही ठिकाणी जोरदार अतिवृष्टी होऊ शकते. या काळात ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहतील, अशी माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: भारताचा 'क्लीन स्वीप'! शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या सामन्यात शेफालीची खेळी ठरली व्यर्थ; कांगारुंनी मारली बाजी

Crime News: माणुसकीला काळिमा फासणारी घटना! 14 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार; आरोपींच्या क्रूर कृत्याने हादरले उत्तराखंड

Goa Politics: "गोव्यात एकाच घरात 80 मतदार; आता सरकारचा पर्दाफाश करू" काँग्रेसचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

Operation Sindoor: 'मेक इन इंडिया'च्या जोरावर भारतानं पाकिस्तानला गुडघे टेकायला लावलं'; 'ऑपरेशन सिंदूर'वर PM मोदींचं मोठं वक्तव्य

Rohit Sharma Lamborghini Urus: 'मुंबईच्या राजा'ने खरेदी केली नवीकोरी Lamborghini, '3015' नंबर प्लेट चर्चेत; किंमत किती?

SCROLL FOR NEXT