Heavy Rain in Mapusa Dainik Gomantak
गोवा

पावसाने म्हापसेकरांची दाणादाण; ओहोळ, नाले तुडूंब!

दोन फुट उंच इतका पाण्याचा स्त्रोत रस्त्यावरुन वाहू लागल्याने वाहतुकीवर परिणाम

आदित्य जोशी

म्हापसा : पावसाने म्हापसा शहरासह बार्देश तालुक्याला गुरुवारी दिवसभर झोडपून काढले. परिणामी, संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे ओहोळ आणि नाले हे दुथडी भरुन वाहू लागले. त्यामुळे शेतात सर्वत्र पाणीच पाणी झाले. शिवाय सकाळी तासभर कोसळलेल्या या मुसळधार पावसामुळे खोर्ली-म्हापसा येथील उसपकर हॉटेलच्या समोरील जंक्शनवर सुमारे दोन फुट उंच इतका पाण्याचा स्त्रोत रस्त्यावरुन वाहू लागल्याने वाहतुकीवर परिणाम झाला.

या पाण्यामुळे रस्त्यावरुन वाहने हाकणे मुश्किल झाले. सकाळच्या वेळी पडलेल्या या मुसळधार पावसामुळे येथील स्थानिकांची दाणादाण उडाली. खोर्ली येथील जंक्शनला टेकूनच श्यामसुंदर कारेकर यांचे घर आहे. पावसाच्या पाण्याची पातळी वाढल्यास त्यांच्या घरात प्रतिवर्षी पाणी शिरते. या परिसरात अलिकडच्या काळात डोंगर उत्तरणीवर अनेक बांधकामे झाल्याने तिथे खणलेली माती, दगड धोंडे नाल्यात शिरतात व प्रवाहात बाधा आणतात.

त्याचप्रमाणे हॉटमिक्सिंगमुळे रस्त्यांची उंची वाढल्याने पाण्याची पातळी वाढते व या घरात पाणी शिरते. शिवाय काही गटारांची रुंदी कमी झाल्याने पावसाच्या पाण्याला रस्त्यावरुन प्रवाहित व्हावे लागते. परिणामी, कारेकर यांच्या घरात पाणी जाते. याविषयी पालिका व प्रशासनाकडे तक्रार करूनही काही उपयोग होत नसल्याचे घरमालक कारेकर यांनी सांगितले.

पाणी साचणे नित्याचेच

तार जंक्शनजवळील उड्डाणपुलाखाली बस्तोडाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर पावसामुळे पाणी साचण्याचे प्रकार आता नित्याचेच बनले आहे. पाणी साचत असल्याने या मार्गाचा अवलंब करणाऱ्या वाहतूकदारांना विशेषतः दुचाकीस्वारांना याचा खूप त्रास सहन करावा लागतोय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vice President Candidate: ठरलं! एनडीए’चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा

Goa Film Festival 2025: ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित, ‘जुझे’ ठरला सर्वाधिक पुरस्कार विजेता चित्रपट

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

Viral Video: 'सापांचा राजा'! जगातील सर्वात लांब विषारी सापाचा व्हिडिओ व्हायरल, एका हल्ल्यात घेऊ शकतो हत्तीचाही जीव

Weekly Health Horoscope: आरोग्याच्या दृष्टीने आव्हानात्मक आठवडा! 'या' 5 राशींनी निष्काळजीपणा टाळावा

SCROLL FOR NEXT