Valvanti River Dainik Gomantak
गोवा

Goa Rain: नद्या तुडुंब, साखळीत पूरस्थिती; गोव्याला पावसाने झोडपले, जनजीवन विस्कळीत

Goa Monsoon 2024: राज्यात मागील २४ तासांत २.९९ इंच पावसाची नोंद करण्यात आली.

Pramod Yadav

पणजी: राज्यात मागील दहा-बारा दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने काल रात्रीपासून दमदार आगमन केले. संततधार पडणाऱ्या पावसामुळे राज्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. रगाडा, म्हादई आणि वाळवंटी नद्या तुडूंब भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. तसेच जनजीवन विस्कळीत झाले.

बाराजण-उसगाव शाळेत पाणी साचल्याने पालकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने अखेर सार्वजनिक बांधकाम खात्याने दुरुस्तीच्या कामाला सुरवात केली. बोगदा मुरगाव रस्त्यावर सकाळी दरड कोसळल्याने येथील वाहतूक बंद झाली असून रस्त्यावर साचलेली माती काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

राज्यात मागील २४ तासांत २.९९ इंच पावसाची नोंद करण्यात आली. रविवारी देखील राज्यात जोरदार पावसाची शक्यता असून गोवा वेधशाळेद्वारे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Water Entered in Sanquelim school

अन् 'साबांखा'ला आली जाग

राज्य सरकार विद्यार्थ्यांना सरकारी शाळेत पाठवा, असे सांगते; परंतु तेथे सुविधा सोडा, शाळांच्या इमारतीही व्यवस्थित नाहीत. थोडा जरी पाऊस पडला की बाराजण-उसगाव येथील शाळेत पाणी साचते.

शाळेची दुरवस्था पाहता सरकारने यावर त्वरित उपाययोजना केली नाही तर पालकांना घेऊन शाळेसमोर बसण्याचा इशारा पंच मनीषा उसगावकर यांनी दिला. या घटनेची दखल घेत तात्काळ सार्वजनिक बांधकाम खात्याने दुरुस्तीच्या कामाला सुरवात केली.

Ragada, Mhadei And Valvanti River

राज्यातील महत्त्वाच्या घटना

1) म्हादई, वाळवंटी, रगाडा नदीच्या पाणी पातळीत वाढ

2) साखळीत पंपाने पाणी उपसा सुरू.

3) खंदकातून पाणी बाहेर न सोडण्याची डिचोलीतील व्यापाऱ्यांची मागणी

4) बाराजण-उसगाव शाळेत साचलेल्या पाण्यामुळे पालक आक्रमक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji: मांडवी पुलावर पेटत्या कारचा थरार! आगीच्या भडक्यात दर्शनी भाग जळून खाक; शॉर्टसर्किट झाल्याचा संशय

Goa Recruitment: तरुणांसाठी खुशखबर! निवड आयोगामार्फत 285 रिक्त जागांसाठी जाहिरात; 'या' पदांसाठी मागवले अर्ज

Vedanta Mining Dispute: पिळगावात दुसऱ्या दिवशीही खनिज वाहतूक बंद; शेतकरी मागणीवर ठाम

IFFI 2024: 'भूमी'चे गोमंतकीयांबद्दल गौरवोद्गार! म्हणाली की, लैंगिक भेदाकडे पाहण्याची दृष्टी...

Goa Crime: पुत्रविरहामुळे व्यथित होऊन 'त्याने' संपवले जीवन! सुसाईड नोटमध्ये केला पत्नी आणि तिच्या प्रियकरावर आरोप; Video मध्ये म्हणाला की...

SCROLL FOR NEXT