Heavy Rain Dainik Gomantak
गोवा

गोव्यात पुढील पाच दिवस ऑरेंज अलर्ट जारी

गोव्यात 1 जून ते 9 जुलै रोजी सकाळपर्यंत सरासरी 62 इंच पावसाची नोंद करण्यात आली आहे.

आदित्य जोशी

पणजी : गोव्यासह कोकणाला दोन दिवस झोडपून काढल्यानंतर पावसाने काहीशी उसंत घेतली आहे. मात्र आता हवामान खात्याने पुन्हा पुढील पाच दिवस ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे पुराचं पाणी ओसरतं न ओसरतं तोच परत एकदा मुसळधार पावसाचा सामना गोवेकरांना करावा लागणार आहे.

गोव्यात 1 जून ते 9 जुलै रोजी सकाळपर्यंत सरासरी 62 इंच पावसाची नोंद करण्यात आली आहे. यात उत्तर गोव्यात आतापर्यंत 59 इंच तर दक्षिण गोव्यात 64 इंच पाऊस झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. यात काल एकाच दिवसात सकाळी 8.30 ते सायंकाळी 4.30 पर्यंत पेडण्यात 2.63 इंच, म्हापशात 1.57 इंच, मडगावात 1.53 इंच, मुरगावात 1.06 इंच पाऊस झाला आहे. तर ओल्ड गोव्यात 24.5 मिमी आणि पणजीत 19.5 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

गेल्‍या काही दिवसांपासून राज्‍यातील बहुतांश धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. राज्‍यातील साळावली धरणासह गोवा आणि महाराष्ट्राचा संयुक्‍त प्रकल्‍प असलेले तिलारी धरणही तुडुंब भरले असून, तिलारीतून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर गोवा आणि महाराष्ट्र सीमवेरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

जलस्रोत खात्‍याने दिलेल्‍या माहितीनुसार साळावली धरण 99 टक्‍के भरले असून, धरणात 23 हजार 160 हेक्‍टर मीटर पाणीसाठा झाला आहे; तर पाण्याची पातळी 41 मीटरपर्यंत पोचली आहे. तिलारी धरण 78 टक्‍के भरले असून, पाणीसाठा 35 हजार 895 हेक्‍टर मीटर इतका झाला आहे. तसेच पाण्याची पातळी 106 मीटरवर पोचली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT