House Collapsed In Siolim 
गोवा

भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते गेले! शिवोलीत 70 वर्षीय महिला बेघर, मुसळधार पावसात घर कोसळले

Pramod Yadav

House Collapsed In Siolim

म्हापसा: काही वर्षांपूर्वी पतीचे निधन, दोन हजार रुपयांचे महिन्याला निवृत्त वेतन आणि दुसरा कोणताही आधार नाही. अशात डोक्यावरचा निवारा देखील मुसळधार पावसाच्या तडाख्यात कोसळला.

शिवोलीत ७० वर्षीय महिलेवर बेघर होण्याची वेळ आली आहे. गोव्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसात या महिलेचे माती घर पूर्णत: जमीनदोस्त झाले आहे

House Collapsed In Siolim

प्रेमावती वेर्णेकर (७०, शिवोली) असे या महिलेचे नाव आहे. गोव्यात गेल्या आठवड्यापासून मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. सततच्या पावसामुळे राज्यात विविध ठिकाणी पडझडीच्या घटना घडत आहेत.

House Collapsed In Siolim

उत्तर गोव्यात देखील देखील सततच्या पावसाचा फटका बसला. शिवोलीत प्रेमावती वेर्णेकर यांचे घर वादळी वाऱ्यासह सुरु असलेल्या मुसळधार पावसात कोसळले. जुन्या ढाच्यातले मातीचे घर पावसात कोसळल्याने महिलेवर बेघर होण्याची वेळ आली आहे.

House Collapsed In Siolim

७० वर्षीय महिलेच्या पतीचे गेल्या काही वर्षापूर्वी निधन झाले होते. दोन हजार रुपयांचे मिळणारे निवृत्त वेतन या पलिकडे कोणताही आधार नसणाऱ्या महिलेचे डोक्यावरचे छत देखील कोसळल्याने महिला हतबल झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IIT चा माजी विद्यार्थी 700 कोटींची गुंतवणूक करणार; गोव्यात धावणार आणखी EV बसेस, मंत्रिमंडळाची मंजुरी

GPSC परीक्षा म्हणजे काय रे भाऊ? 50 टक्के विद्यार्थ्यांना नाही माहिती, Goa University च्या कामगिरीवर मुख्यमंत्री नाराज

पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, बापाची बाल न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता; हायकोर्टाने रद्द केला आदेश

Waqf Amendment Bill 2024: वक्फ बोर्ड कायदा प्रस्तावित दुरुस्तीवरून गोंधळ सुरुच, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

ED Raid: फ्लॅट्सच्या नावाखाली 636 कोटींची फसवणूक; मेरठमधील व्यावसायिकाच्या दिल्ली, गोव्यातील मालमत्तेवर छापे

SCROLL FOR NEXT