Bicholim Heavy Rain Dainik Gomantak
गोवा

Bicholim Heavy Rain: डिचोलीत आठवडी बाजार थंडावला; पावसाचा तडाखा, अनेक ठिकाणी झाडांची पडझड

Bicholim Heavy Rain: गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसाने सलग तिसऱ्या दिवशीही कहर केला.

दैनिक गोमन्तक डिजिटल

डिचोली: गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसाने सलग तिसऱ्या दिवशीही कहर केला. डिचोलीसह तालुक्यातील बहुतांश भागांत दमदार पाऊस पडला. जोरदार पावसामुळे सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले. विविध ठिकाणी झाडांची पडझड होताना आठवडी बाजारालाही पावसाचा तडाखा बसला.

पावसावेळी डिचोली अग्निशमन दलाच्या कार्यक्षेत्रात एका घरावर मिळून तीन ते चार ठिकाणी झाडांची पडझड झाली. मयते-अस्नोडा येथे एका घराची झालेली किरकोळ मोडतोड वगळता मोठे नुकसान झाले नाही, अशी माहिती डिचोली अग्निशमन दलाकडून मिळाली.

पिंपळवाडा-आमोणे, धुमासे आणि न्यूवाडा-पिळगाव येथे रस्त्यावर झाडे कोसळली. अग्निशमन दलाचे उपअधिकारी शिवाजी नाईक, हवालदार राजन परब आणि अर्जुन धावस्कर यांच्या नेतृत्वाखाली दलाच्या जवानांनी विविध ठिकाणी धाव घेऊन मदतकार्य केले.

चालक ऑपरेटर नीलेश हळर्णकर आणि कपिल गावस यांच्यासह रूपेश गावस, वासुदेव ताटे, गौरेश गावस, बाबुली मांद्रेकर, अमोल चोर्लेकर आदी दलाच्या जवानांनी मदतकार्य केले. सकाळपासूनच पावसाने जोर धरला होता. दुपारी तीन वाजेपर्यंत जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. डिचोलीतील आठवडी बाजारावर मोठा परिणाम जाणवला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT