Housing Colony Wall Collapse Dainik Gomantak
गोवा

मुसळधार पावसाचा तडाखा! आके येथील गृहनिर्माण वसाहतीची संरक्षक भिंत कोसळली; परिसरात भीतीचं वातावरण

Aque Retaining Wall Collapse: मुसळधार पावसामुळे सोमवारी (ता.२९) आके येथील एका गृहनिर्माण वसाहतीतील संरक्षक भिंत कोसळण्याची घटना घडली.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: मुसळधार पावसामुळे सोमवारी (ता.२९) आके येथील एका गृहनिर्माण वसाहतीतील संरक्षक भिंत कोसळण्याची घटना घडली. सुदैवाने यात कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र, या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

स्थानिक रहिवाशांच्या माहितीनुसार, ही भिंत गेल्या काही काळापासून धोकादायक अवस्थेत झुकलेली होती. याबाबत मालमत्ता मालकाकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र, आवश्यक दुरुस्ती किंवा सुरक्षेची उपाययोजना करण्यात आली नाही.

सुदैवाने, भिंत कोसळली तेव्हा त्या ठिकाणी कोणीही नसल्याने कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी उर्वरित धोकादायक भागाची तातडीने तपासणी करून आवश्यक ती उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जुन्या आणि धोकादायक इमारती तसेच संरक्षक भिंतींची तपासणी करण्याची गरज असल्याचे यावेळी नागरिकांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Star Cricketer Retirement: ''मी लढाई हरलो...'', स्टार वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम; सततच्या दुखापतींना कंटाळून घेतला मोठा निर्णय

Asian Games Final 2026: अजिंक्य टीम इंडियाची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये भारतीय पोरींनी श्रीलंकेला 147 धावांनी लोळवलं; एशियन गेम्समध्ये भारताचा डंका

Women Cancer Symptoms : महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग कोणता? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच तपासणी करा

Goa Ranji 2026: गोव्याच्या रणजी संघाची तयारी अंतिम टप्प्यात, स्पर्धेपूर्वी महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

Goa Rain Shortage: पाऊस न पडल्यास भातशेती धोक्यात; कणसे धरू लागल्याने दिवसातून किमान एक हलकी सर आवश्यक, कृषी संचालकांचा इशारा

SCROLL FOR NEXT