

पणजी: राज्यात मागील दोन-तीन दिवस मंदावलेला पाऊस रविवारपासून पुन्हा सक्रिय झाला असून विविध भागांत जोरदार पाऊस पडत आहे. मागील २४ तासांत जुने गोवे वगळता सर्वच भागांत एक इंचाहून अधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे.
राज्यात पावसाने २० इंचांचा टप्पा गाठला असून आतापर्यंत २०.१५ इंच इतक्या पावसाची नोंद झाली आहे. राज्यात ४१.३ टक्के इतका पावसाचा तुटवडा आहे. आतापर्यंत राज्यात ३४.३२ इंच पाऊस पडणे अपेक्षित होते.
पुढील चार दिवस राज्यात ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. नागरिकांनी पावसाच्या कालावधीत योग्य ती काळजी घ्यावी, तसेच मच्छिमारांनी समुद्रात प्रवेश करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
तुटवड्याचे वर्ष
राज्यात यंदा जून महिन्यात २० जूनपर्यंत तब्बल ७१ टक्के पावसाचा तुटवडा नोंदविण्यात आला होता. परंतु मागील आठ दिवसांत पडलेल्या पावसामुळे सुमारे ३० टक्के तूट भरून निघाली आहे; मात्र अजूनही ४१.३ टक्के इतका पावसाचा तुटवडा कायम आहे. एकंदरीत पुढील एका दिवसात हा तुटवडा भरून काढणे शक्य नसल्याने, राज्यातील हे वर्ष सर्वाधिक पावसाच्या तुटवड्याच्या वर्षांपैकी एक ठरणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.