Goa Heavy Rain Dainik Gomantak
गोवा

Goa Heavy Rain: सत्तरीत वादळी वाऱ्यामुळे 27 ठिकाणी झाडे कोसळली; पडझड सुरूच, अग्निशमन दलाची दिवसभर धावपळ

Heavy Rain Sattari Goa: मुसळधार पाऊस आणि जोरदार वादळी वाऱ्याने मंगळवारी सत्तरी तालुक्यात अक्षरशः धुमाकूळ घातला.

दैनिक गोमन्तक डिजिटल

वाळपई: मुसळधार पाऊस आणि जोरदार वादळी वाऱ्याने मंगळवारी सत्तरी तालुक्यात अक्षरशः धुमाकूळ घातला. अवघ्या एका दिवसात २७ ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने जनजीवन विस्कळीत झाले. अनेक रस्ते बंद झाले, तर वीजवाहिन्यांवर झाडे कोसळल्याने विविध भागांतील वीजपुरवठा खंडित झाला.

काही ठिकाणी झाडे घरांवर, गोठ्यांवर आणि वाहनांवर कोसळून मोठे नुकसान झाले. सकाळच्या वेळी रस्त्यावर झाडे पडल्याने शाळकरी विद्यार्थी, नोकरदार आणि प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. काही नागरिकांना अडथळे पार करून पायी मार्गक्रमण करावे लागले.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जमिनीतील ओलावा वाढला असून, त्यात वादळी वाऱ्याची भर पडल्याने मोठी रानटी व फळझाडे कोसळण्याच्या घटना वाढल्या आहेत. परिणामी वाहतूक व्यवस्था तसेच वीजपुरवठ्यावर परिणाम झाला.

अग्निशमन दलाला सकाळपासून संध्याकाळपर्यंत २७ आपत्कालीन कॉल प्राप्त झाले. कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत झाडे हटवून रस्ते मोकळे करण्याचे काम केले. वीज खात्याच्या कर्मचाऱ्यांनीही युद्धपातळीवर प्रयत्न करून वीजपुरवठासुरळीत करण्यासाठी काम केले. मात्र, सततच्या पावसामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

विविध ठिकाणी पडझडीच्या घटना

सोनाळ येथे रस्ता व वीजवाहिनीवर झाड कोसळून वाहतूक ठप्प.

धारखंड-धावे मार्गावर झाड पडून वाहतुकीस अडथळा झाला.

शांतीनगर, होंडा येथे झाड कोसळल्याने रस्ता बंद झाला.

म्हादई-अडवई येथे घरावर झाड पडून लाखोंचे नुकसान झाले.

अडवई-कुंभारवाड्यात झाड पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला.

धावे-धनगरवाड्यात दूध संस्थेजवळ काजूचे झाड पडले.

उस्ते येथील सातेरी मंदिराजवळ झाड कोसळून मार्ग बंद झाला.

खोतोडा बिग बॉस गॅरेज परिसरात घरावर झाड पडले.

गोमळ-वेळगे येथे वीजवाहिनीवर झाड पडून नुकसान झाले.

विविध गावांत झाडे पडल्याने अनेक रस्ते बंद झाले.

पिसुर्ले येथे गटारात पडलेल्या गायीची अग्निशमन दलाने सुटका.

वाळपई आयआरबी कॅम्प परिसरात वाहनावर झाड पडून नुकसान.

होंडा व इतर भागांत शाळांजवळ झाडे पडून मार्ग बंद झाले.

औषध फवारणी रखडली!

सत्तरी तालुक्यात पावसामुळे बागायती पिकांचे नुकसान झाले असून सुपारी पिकावरील औषध फवारणीची कामे थांबली आहेत. जोरदार वाऱ्यामुळे सुपारीच्या झाडावर चढणे शक्य होत नसल्याने बागायतदार अडचणीत आले आहेत. जूनमध्ये पहिली फवारणी झाल्यानंतर आता दुसऱ्या फवारणीसाठी शेतकरी प्रतीक्षेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: सैन्यात भरती होण्यासाठी धावायचा, आज बनला देशाचा हिरो! गुलवीर सिंहने रचला इतिहास; 10,000 मीटर शर्यतीत जिंकलं 'सिल्व्हर' पदक

Anjuna Drowning Incident: पाय घसरला अन् थेट उधाणलेल्या समुद्रात कोसळला! 26 वर्षीय मणिपूरच्या तरुणाचा मृत्यू;  हणजूण समुद्रकिनाऱ्यावरील धक्कादायक घटना

Sanjeel Kudchadkar Kidnapping Case: "चलत्या गाडीत गळा दाबून मारण्याचा प्रयत्न!" संजील कुडचडकरची धक्कादायक जबानी; पत्नी लुईझा अद्याप बेपत्ताच

Jantar Mantar Student Protest: आंदोलक दहशतवादी होते का? लोकसभेत प्रियांका गांधींचा रुद्रअवतार; विद्यार्थ्यांच्या दडपशाहीवरुन मोदी सरकारवर हल्लाबोल

Goa Drowning Incident: उधाणलेल्या लाटा अन् जीवरक्षकांचे शौर्य! सलग तीन दिवसांत 3 होड्या उलटल्या; कोलवा आणि बाणावलीत 28 मच्छीमारांची सुखरुप सुटका

SCROLL FOR NEXT