Post monsoon rain in Goa Dainik Gomantak
गोवा

हाताशी आलेली भातशेती आडवी, पणजीत घराचे नुकसान; गोव्यात मान्सूनोत्तर पावसाचे धुमशान

Goa heavy rain news: दमदार पावसाच्या हजेरीमुळे राज्यात ठिक ठिकाणी झाडे पडून नुकसानीच्या घटना घडल्या. मये तीर्थ बाग आणि नगरगाव सत्तरी येथे झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: अरबी समुद्रात तसेच बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाचा पट्टा आणि त्याची वाढलेली तीव्रता यामुळे सोसाट्याच्या वाऱ्यासह काही दिवसांपासून राज्यासहित कोकण पट्ट्यात मोठ्या प्रमाणात मान्सूनोत्तर पावसाचे धुमशान सुरू आहे.

राज्याच्या विविध भागात आज झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. या पावसामुळे पिकाचेही नुकसान झाले आहे. पुढील तीन दिवस राज्यात अशाच प्रकारे जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेने व्यक्त केली असून 'यलो अलर्ट' कायम ठेवला आहे.

भातशेती आडवी यंदा

भातशेती पूर्ण बहरात येवून भातपिक समाधानकारक मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या, बळीराजा भात कापणीच्या तयारीत असतानाच पावसाचा कहर सुरु झाला. डिचोली, सत्तरी आणि बार्देशातील काही भागात पावसामुळे भातशेती आडवी झाली आहे.

इतर पीकांना देखील मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला आहे. शेतीत साचलेले पाणी आणि पावसाचे सावट लक्षात घेता, सध्या भातकापणी सोडाच, कापणी यंत्रही शेतीत उतरविणे अवघड बनले आहे. त्यामुळे यंदा हातातोंडाशी आलेले भातपिक वाया गेल्यातच जमा झाले आहे.

पणजीत घराचे किरकोळ नुकसान

दमदार पावसाच्या हजेरीमुळे राज्यात ठिक ठिकाणी झाडे पडून नुकसानीच्या घटना घडल्या. मये तीर्थ बाग आणि नगरगाव सत्तरी येथे झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. पणजीतील चर्च व्हा इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळल्याने येथील घरांचे किरकोळ नुकसान झाले. ही घटना पहाटे २.३० च्या सुमारास घडली.

वादळी वाऱ्यामुळे श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम येथे उभारण्यात आलेले सजावट कोसळली. सकाळी सुरू झालेल्या पावसामुळे कामावर येणाऱ्या नागरिकांना रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूकीस अडथळा निर्माण झाला.

मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा

राज्यात मागील २४ तासात सरासरी ३ इंच पावसाची नोंद करण्यात आली आहे. राज्यात १ ते २५ ऑक्टोबर दरम्यान सरासरी ७.३० इंच पावसाची नोंद झाली आहे.

२५ ते २८ ऑक्टोबर दरम्यान वाऱ्याचा वेग ताशी ३५ ते ५५ किमीपर्यंत पोहोचण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांनी समुद्रात उतरू नये असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Star Cricketer Retirement: ''मी लढाई हरलो...'', स्टार वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम; सततच्या दुखापतींना कंटाळून घेतला मोठा निर्णय

Asian Games Final 2026: अजिंक्य टीम इंडियाची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये भारतीय पोरींनी श्रीलंकेला 147 धावांनी लोळवलं; एशियन गेम्समध्ये भारताचा डंका

Women Cancer Symptoms : महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग कोणता? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच तपासणी करा

Goa Ranji 2026: गोव्याच्या रणजी संघाची तयारी अंतिम टप्प्यात, स्पर्धेपूर्वी महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

Goa Rain Shortage: पाऊस न पडल्यास भातशेती धोक्यात; कणसे धरू लागल्याने दिवसातून किमान एक हलकी सर आवश्यक, कृषी संचालकांचा इशारा

SCROLL FOR NEXT