Container Overturned At Thivim Dainik Gomantak
गोवा

Thivim Accident: थिवी येथे स्टीलवाहू कंटेनरचा अपघात; चालक जखमी

कोलवाळ पोलिस व म्हापसा अग्निशामक दलाच्या जवानांनी चालकाला बाहेर काढले

Rajat Sawant

Container Overturned At Thivim: थिवी येथे रस्त्याच्या बाजूला अवजड कंटेनर कलंडल्याची घटना रविवारी पहाटे 4 च्या सुमारास घडली. अपघाताची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी कंटेनर चालकाला केबीनबाहेर काढले.

अपघातात चालक किरकोळ जखमी झाला असून चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला. अपघातानंतर रस्त्यावर डिझेल गळती झाली होती. त्यावर कोलवाळ पोलिस व म्हापसा अग्निशामक दलाच्या जवानांनी माती टाकून वाहतूक सुरळीत केली. मात्र या अपघातामुळे वाहनचालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गोव्यातून मुंबईच्या दिशेने जाण्याऱ्या अवजड कंटेनरचा कांसा थिवी चर्चजवळ अपघात झाला. कंटेनर चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनर रस्त्याच्या बाजूला कलंडला.

या अपघातात कंटेनर ट्रेलरपासून अलग होऊन तलावाच्या बाजूला कलंडल्याने चालकाच्या हाताला व पायाला दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच कोलवाळ पोलिस व अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.

जवानांनी मोहिम राबवित कंटेनर बाहेर काढला. जखमी चालकाला उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. यावेळी रस्त्यावर डिझेल गळती झाली होती.

कोलवाळ पोलिस आणि म्हापसा अग्निशामक दलासह स्थानिक अधिकाऱ्यांनी रस्त्यावर सांडलेल्या डिझेलवर माती टाकून वाहतूक सुरळीत केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT