Heatwave Alert Issued In Goa Rising Temperatures Affect Locals And Tourists
पणजी: गोव्यात सध्या जोरदार उन पडत असल्याने वातावरणात वाढलेल्या उष्णतेमुळे गोमंतकीयांना मोठ्या प्रमाणात उकाड्याला सामोरे जावे लागत आहे. वाढत्या तापमानामुळे अधिकाऱ्यांनी राज्यात 4 मार्च मंगळवारी (आज) आणि 5 मार्च बुधवारी (उद्या) उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे, ज्यामुळे गोमंतकीयांसह पर्यटकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, 3 ते 5 मार्च या कालावधीत राज्यात काही ठिकाणी वातावरण उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता आहे. या तीन दिवसांसाठी हवामान खात्याने 'उष्णतेचा यलो अलर्ट' जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची (Health) काळजी घ्यावी.
गेल्या आठवड्यात राजधानी पणजीत (Panaji) कमाल तापमानाची नोंद झाली. पणजीत कमाल तापमान पाच दिवस 37 अंश होते. गोव्यातील सामान्य वातावरण उष्ण आणि दमट असले तरी हवामान खात्याकडून उष्णतेच्या लाटेचा इशारा वर्तवण्यात आल्याने आणखी चिंता वाढली आहे.
दरम्यान, उन्हाळा सुरु झाल्यावर शरीराची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. उन्हाच्या तीव्रतेमुळे उष्माघात, पाण्याची कमतरता, त्वचेच्या समस्या आणि इतर अनेक त्रास होऊ शकतात. उष्णतेच्या लाटेमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होते, ज्यामुळे थकवा, चक्कर येणे, डिहायड्रेशन आणि उष्माघात यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे शरीर हायड्रेटेड ठेवणे गरजेचे ठरते. दररोज पुरेसे पाणी पिणे, नारळ पाणी, ताक, लिंबू सरबत आणि फळांचे रस यांचा आहारात समावेश करावा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.