Heat Wave in Goa Dainik Gomanta
गोवा

Heat Wave : एप्रिलमधील सर्वाधिक तापमानाची नोंद ; पारा ३५.२ अंश सेल्सिअसवर

Heat Wave : तापमानाचा पारा ३६ अंशांवर पोहोचणे, हे उष्णतेची लाट उंबरठ्यावर असल्याचे संकेत आहेत. ज्यावेळी कमाल तापमान ३७ अंशांवर जाते, त्यावेळी उष्णतेची लाट मानली जाते.

गोमन्तक डिजिटल टीम

Heat Wave :

पणजी, राज्यात दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत चालला आहे. शुक्रवारी ३५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. हे यंदाच्या एप्रिल महिन्यातील सर्वाधिक तापमान आहे.

१९ ते २१ एप्रिलदरम्यान राज्यात कमाल तापमानाचा पारा ३६ अंशांवर पोहोचण्याची शक्यता गोवा वेधशाळेने वर्तविली आहे. राज्यात पुढील दहा दिवसांत मोठ्या प्रमाणात उष्मा जाणवणार असून आर्द्रताही सरासरीच्या तुलनेत अधिक असणार आहे.

९१ टक्के आर्द्रता

तापमानाचा पारा ३६ अंशांवर पोहोचणे, हे उष्णतेची लाट उंबरठ्यावर असल्याचे संकेत आहेत. ज्यावेळी कमाल तापमान ३७ अंशांवर जाते, त्यावेळी उष्णतेची लाट मानली जाते. शुक्रवारी राज्यात ९१ टक्के एवढ्या कमाल आर्द्रतेची नोंद करण्यात आली. गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यात पावसाची चिन्हेही दिसत आहेत. मात्र, दमट हवामानामुळे अंगाची लाही लाही होत आहे.

दुपारी घराबाहेर जाणे टाळा!

वाढत्या तापमानाचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. खासकरून आजारी व्यक्ती, ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणे जरूरीचे आहे. नागरिकांना निर्जलीकरणाचा (डिहायड्रेशन) त्रास होऊ शकतो. सुक्या गवताला आग लागू शकते. उन्हातून फिरताना योग्य ती काळजी घ्यावी, तसेच दु. १२ ते ३ वाजेपर्यंत शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन गोवा वेधशाळेने विशेष पत्रकाद्वारे केले आहे.

गोव्यात तापमानाचा वाढता आलेख कायम आहे. कमाल तापमानासह किमान तापमानाचा पाराही वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी. महाराष्ट्र तसेच कर्नाटक राज्यात तापमानाचा पारा ३९ अंशांवर पोहोचला आहे. कोकणात यलो अलर्ट जारी केला आहे. नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी.

- नहूष कुलकर्णी, संचालक, गोवा वेधशाळा.

दुपारी घराबाहेर जाणे टाळा!

वाढत्या तापमानाचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. खासकरून आजारी व्यक्ती, ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणे जरूरीचे आहे. नागरिकांना निर्जलीकरणाचा (डिहायड्रेशन) त्रास होऊ शकतो. सुक्या गवताला आग लागू शकते.

उन्हातून फिरताना योग्य ती काळजी घ्यावी, तसेच दु. १२ ते ३ वाजेपर्यंत शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन गोवा वेधशाळेने विशेष पत्रकाद्वारे केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Mega Project: कारापूर-सर्वण मेगा प्रकल्पावर 2 दिवसांत निर्णय, शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; अधिकाऱ्यांना कागदपत्रे तपासण्याच्या सूचना

Indian Cricketers Ban: भारतीय क्रिकेटमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा फ्रॉड! अंडर-19 वर्ल्ड कप स्टार अडकला जाळ्यात; 65 खेळाडूंवर बंदी

Goa Accident: गोव्यात अपघातांची धडकी भरवणारी आकडेवारी! 19 महिन्यांत 1107 जणांचा मृत्यू; दिवसाला दोन जीवांचा बळी

Shukra Gochar 2026: वैभव अन् संपत्तीचा कारक बदलणार चाल! शुक्राचे नक्षत्र गोचर 5 राशींसाठी ठरणार वरदान; धनाचा होणार वर्षाव

Madgaon Urban Bank: मडगाव अर्बनच्या ठेवीदारांना पुन्हा धक्का; पैसे मिळण्याची निश्चित तारीखच नाही! 4.20 कोटींच्या वसुलीसाठी 154 खटले

SCROLL FOR NEXT