Heat Wave Dainik Gomantak
गोवा

Heat Wave : राज्यात उष्मा वाढला; जरा आरोग्य सांभाळा!

Heat Wave : मद्य, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड शीतपेये टाळा, ज्यामुळे शरीराचे निर्जलीकरण होते. उच्च प्रथिनेयुक्त अन्न टाळा.

गोमन्तक डिजिटल टीम

Heat Wave :

पणजी, सध्या राज्यात कमालीचा उकाडा जाणवू लागला आहे. उष्माघात, रक्तदाब वाढणे, भोवळ येणे, अस्वस्थ वाटणे अशा समस्याही जाणवू लागल्या आहेत. उष्णतेच्या लाटेपासून बचावासाठी राज्य आरोग्य संचालनालयाने काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

उष्णतेपासून वाचण्यासाठी या गोष्टी करा...

  • तहान लागली नसली तरीही पुरेसे पाणी प्या. 

  • वजनाने हलके, फिक्या रंगाचे, सैल आणि सच्छिद्र सुती कपडे वापरा. उन्हात बाहेर पडताना गॉगल, छत्री, टोपी, शूज वापरा.  

  • ओआरएस, नारळ पाणी, घरगुती पेये म्हणजे लस्सी, तोरणी (तांदूळ पाणी), लिंबू पाणी, ताक इत्यादींचा वापर करा. 

  • तुम्हाला अशक्त किंवा आजारी वाटत असल्यास ताबडतोब डॉक्टरांना भेटा.

  • तुमचे घर थंड ठेवा, पडदे, शटर किंवा सनशेड वापरा आणि रात्री खिडक्या खुल्या ठेवा. पंखे, ओले कपडे वापरा आणि अधिकतर थंड पाण्याने आंघोळ करा.

  • कामाच्या ठिकाणी पिण्यासाठी थंड पाणी उपलब्ध करावे.

  • गर्भवती महिलांना आणि आजारी असलेल्या इतरांना अतिरिक्त विश्रांती द्या.

या गोष्टी टाळा

  • पार्क केलेल्या वाहनांमध्ये लहान मुले किंवा पाळीव प्राणी ठेवू नका. उन्हात विशेषतः दुपारी १२ ते ३ वा. या वेळेत बाहेर जाणे टाळा.

  • गडद, जड किंवा घट्ट कपडे घालणे टाळा. जेव्हा बाहेरचे तापमान जास्त असते तेव्हा जड कामे टाळा. घाईगडबडीच्या वेळी स्वयंपाक करणे टाळा. 

  • मद्य, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड शीतपेये टाळा, ज्यामुळे शरीराचे निर्जलीकरण होते.

  • उच्च प्रथिनेयुक्त अन्न टाळा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ISL 2026: 'एफसी गोवा'चा धडाका, दोन गोलने विजय; मुंबई सिटीची अपराजित दौड खंडित

Horoscope: मेहनतीला मिळणार यशाची सुवर्ण जोड! 'गजकेसरी' योगामुळे 5 राशींच्या आयुष्यात येणार सुखाचे दिवस, संपत्तीत होणार अपार वाढ

GCA Premier League: 'धेंपो' गोव्यातील 'चॅम्पियन' क्रिकेट क्लब, 'चौगुले'विरुद्धच्या अंतिम लढतीत पहिल्या डावातील आघाडीवर बाजी

VIDEO: LIVE मॅचमध्ये हायव्होल्टेज ड्रामा!निमंत्रण न मिळाल्याने संतापला तरुण, थेट खेळपट्टीवरच ट्रॅक्टर फिरवला; पाहा व्हिडिओ

Margao Muncipal: नगरपालिका उद्यानात 'कॅफेटेरिया'चा प्रस्ताव मंत्री दिगंबर कामत यांनीच दिला! प्रभव नायक यांचा आरोप

SCROLL FOR NEXT