Tarun Tejpal Dainik Gomantak
गोवा

तरुण तेजपाल यांच्या प्रकरणावरील सुनावणी 14 मार्चपर्यंत तहकूब

तरुण तेजपाल (Tarun Tejpal) याच्या निर्दोषत्वाला राज्य सरकारने आव्हान दिलेल्या याचिकेवरील सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने आज पुन्हा 14 मार्चपर्यंत तहकूब केली.

दैनिक गोमन्तक

तरुण तेजपाल याच्या निर्दोषत्वाला राज्य सरकारने आव्हान दिलेल्या याचिकेवरील सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) गोवा खंडपीठाने (Goa Bench) आज पुन्हा 14 मार्चपर्यंत तहकूब केली. उच्च न्यायालयाने ही सुनावणी इन कॅमेरा मध्ये घेण्यासाठी केलेला अर्ज फेटाळला होता त्यामुळे त्याला आव्हान केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) प्रलंबित आहे ती अजूनही सुनावणीस घेण्यात आली नसल्याची माहिती आज तेजपाल यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयासमोर दिली.

दरम्यान, तेजपाल यांच्या वतीने आज ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल (kapil sibal) यांनी बाजू मांडताना सांगितले की सरकारने (government) आव्हान दिलेल्या याचिकेतील केलेली दुरुस्ती त्याची माहिती तसेच इतर दस्तावेज दिलेला नाही त्यामुळे ही सुनावणी पुढे ढकलण्यात यावी अशी विनंती गोवा खंडपीठाला केली.यावेळी सरकारतर्फे ॲडव्होकेट जनरल देविदास पांगा यांनी बाजू मांडताना सांगितले की याचिकेत दुरुस्ती केलेल्याची माहिती एका आठवड्यात तेजपाल यांच्या वकिलांना दिली जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT