DySP Sagar Ekoskar  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: उपअधीक्षक सागर एकोस्कर विरोधातील दोन तक्रारीवर 10 रोजी एसपीसीए समोर सुनावणी

व्यावसायिक कुतीन्हो यांचे राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री तसेच आयबी कार्यालयालाही पत्र

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव (खास प्रतिनिधी) : पोलिसांनी मागितलेली लाच देण्यास नकार दिल्याने मायणा कुडतरी पोलीस स्थानकाचे तत्कालीन निरिक्षक व सध्याचे उपअधीक्षक सागर एकोस्कर याच्या आणि अन्य पोलीसांच्या विरोधात 10 नोव्हेंबरला एसपीसीए समोर सुनावणीस होणार आहे. मडगाव येथील व्यावसायिक फ्लोयड कुतीन्हो यांनी एसपीसीए प्राधिकरणाकडे तक्रार दाखल केली होती.

पोलीसांनी खातरजमा न करता आयबी शाखेचा दिशाभूल करणारा अहवाल दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक अभिषेक धनीया यांनी पाठविल्याने त्यांचीही चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. सध्या कुतीन्हो हे लंडनमध्ये असून भारतातील सर्व विमानतळावर त्यांच्या नावाची लूक आऊट नोटीस असल्याने त्यांना गोव्यात येणे शक्य होत नाही. एसपीसीए समोर जी तक्रार दाखल केली आहे त्यात धनिया यांच्याबरोबर उप अधीक्षक सागर एकोस्कर, उपनिरीक्षक तेजस कुमार नाईक तसेच अन्य दोन पोलीस शिपायांचा समावेश आहे.

मायणा - कुडतरी पोलीस स्थानकावर २०२० साली १३९/२०२० या क्रमांकाखाली नोंद झालेल्या प्रकरणात कुतीन्हो यांच्या विरोधात मडगाव प्रथम वर्ग न्यायालयाने विनाजामीन वॉरंट दाखल केले असून त्यामुळे त्यांच्या विरोधात लूक आऊट नोटीस जारी करावी अशी मागणी करणारे पत्र अधीक्षक धनीया यांनी ११ मार्च २०२२ रोजी आयबीच्या अधिकाऱ्यांना पाठविले होते. मात्र मडगाव येथील मुख्य न्यायदंडधिकारी सुधीर शिरगावकर यांनी माहिती अधिकार कायद्याखाली दिलेल्या माहितीत वर नमूद केलेल्या क्रमांकाच्या प्रकरणात कुतीन्हो यांच्या विरोधात कुठलेही वॉरंट जारी केलेले नाही हे स्पष्ट केले आहे.

या संदर्भात कुतीन्हो यांनी राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री तसेच आयबी कार्यालयाला लिहिलेल्या पत्रात गोवा पोलिसांनी केंद्रीय यंत्रणाना खोटी माहिती देऊन दिशाभुल करून आपल्या विरोधात लूक आऊट नोटीस काढण्यास भाग पाडले असून ही नोटीस त्वरित मागे घ्यावी अशी मागणी केली आहे. आपल्याकडून पैसे उकळण्याचे प्रयत्न केले असा आरोप करून ही खोटी केस तयार करणाऱ्या पोलिसांची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

दरम्यान वाळपई येथे बेकायदा खनिज वाहतुकीविरोधात आवाज उठविणारे पर्यावरण कार्यकर्ते दशरथ परब आणि अन्य आंदोलकाना वाळपई पोलीस स्थानकात स्थानबद्ध असताना केलेल्या कथित मारहाण प्रकरणाची सुनावणीही 10 नोव्हेंबर रोजी एसपीसीए समोर होणार आहे. या प्रकरणी एकोस्कर व अन्य अधिकाऱ्यांची खात्या अंतर्गतही चौकशी चालू आहे. पोलीस अधिक्षक सेमी तावारीस हे ही चौकशी करत आहेत. एकोस्कर यांच्या सांगण्यावरूनच आम्हाला पोलीसांनी मारहाण केली अशी साक्ष परब यांनी या अधिकाऱ्यासमोर दिली आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

कणखर गृहमंत्री ते संवेदनशील कृषीमंत्री: रवी नाईक यांच्या व्यक्तिमत्त्वाचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून गौरवोद्गार

Ravi Naik: 'मी फक्त पुढे, सेनापती मात्र रवीच'; दिवंगत नेत्याला भावनिक आदरांजली

Horoscope: 71 वर्षांनंतर महासंयोग! यंदाची दिवाळी 5 शुभ योगांची, 'या' राशींचे भाग्य उजळणार; शुभ कार्यांसाठी सर्वोत्तम काळ

1310-1312 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीच्या मोठ्या सैन्याने कोकणात प्रवेश केला, कदंबांची गोव्यातील राजधानी गोपकपट्टणाचा नाश केला..

Mini Narkasur: दिवाळीची लगबग! 'मिनी नरकासुर' विक्रीसाठी सज्ज; किंमत वाचून थक्क व्हाल

SCROLL FOR NEXT