Goa Rain: गोव्यातून परतीच्या पावसाची 'एक्झिट'

1 जून ते 25 ऑक्टोबर या काळात 110.93 इंच पाऊस
Rain in Goa
Rain in GoaDainik Gomantak

Goa Rain: गेल्या काही दिवसात परतीच्या पावसाने गोव्याला अनेक भागांमध्ये चांगलाच तडाखा दिला होता. तथापि, आता परतीच्या पावसाने गोव्यातून एक्झिट घेतली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा गोव्यात परतीच्या पावसाचा कालावधी लांबला आहे.

Rain in Goa
Projects in Goa : गोव्यासाठी घातक असलेले सर्व प्रकल्प रद्द करा

गेल्या काही वर्षात ऋतुचक्र बदलत चालले आहे. अर्थातच मान्सुनवरही त्याचा परिणाम होत आला आहे. पावसाचे प्रमाण आणि कालावधीही गेल्या काही वर्षांमध्ये बदलत चालले आहे. गतवर्षी गोव्यात नैऋत्य मान्सून 14 ऑक्टोबरपर्यंत बरसत होता.

यंदा मात्र या कालावधीत दहा दिवसांची वाढ झाली आहे. यंदा गोव्यात 23 ऑक्टोबरपर्यंत परतीचा मान्सून बरसत होता. पावसाच्या यंदाच्या हंगामात म्हणजेच 1 जून ते 25 ऑक्टोबर या काळात गोव्यात 110.93 इंच पावसाची नोंद झाली आहे.

Rain in Goa
Goa Congress MLA Defection : आमदारांच्या बंडानंतर महिना उलटला; काँग्रेसला मात्र प्रतीक्षा कागदपत्रांची

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून देशभरातून पावसाच्या परतीच्या प्रवासाला सुरवात झाली होती. विदर्भासह छत्तीसगड, ओडिशा, तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि बंगालच्या उपसागरासह देशाच्या उर्वरित भागातूनही पावसाने माघारी सुरवात केली होती.

भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार गोव्यातील अनेक भागात परतीच्या पावसाने जोरदार तडाखा दिला होता. पणजी येथे 31.4 मिमी, जुना गोवा 20.4 मिमी, सांगे येथे 19 मिमी, फोंडा 9 मिमी, काणकोण येथे 8.2 मिमी पावसाची नोंद झाली होती. तसेच अनेक ठिकाणी फ्लॅश फ्लडचे प्रकार घडले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com