Vishwajeet Rane Dainik Gomantak
गोवा

Vishwajeet Rane: आरोग्य सेवेसंदर्भात करणार मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा; आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे

Vishwajeet Rane: विलंब मान्य : द. गो. जिल्हा इस्पितळात पुरविणार सुविधा

दैनिक गोमन्तक

Vishwajeet Rane: दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात सर्वप्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सुविधा पुरवण्यात विलंब झाला आहे. मात्र, ज्या रुग्णांचा आजार अधिक किचकट आहे, त्यांच्या सखोल तपासणीसाठी त्यांना गोमेकॉ किंवा सुपर स्पेशालिटी ब्लॉकमध्ये पाठवावे लागते.

पुढील आठवड्यात मुख्यमंत्र्यांसोबत आरोग्य सेवेसंदर्भात चर्चा केली जाईल, असे मत आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी व्यक्त केले.

आमदार विजय सरदेसाई यांनी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळातील सोयीसुविधांसंदर्भात उच्च न्यायालयात याचिका सादर केली आहे. याबाबत आरोग्यमंत्री राणे म्हणाले की, प्रत्येकाला उच्च न्यायालयात याचिका सादर करण्याचा अधिकार असून कोणी कोणाला थांबवू शकत नाही. याचिका सादर केली म्हणून आरोग्यासंदर्भातील सर्व गोष्टी झटक्यात पूर्ण होत नाहीत.

यासंदर्भात पूर्वी मुख्यमंत्र्यांशी माझी चर्चा झाली होती. ज्या सोयीसुविधा जिल्हा इस्पितळात आवश्‍यक आहेत, त्यावर गंभीरपणे पुन्हा चर्चा केली जाईल.

सरकारी इस्पितळांवर जनतेचा विश्‍वास

फोंडा उपजिल्हा इस्पितळात रुग्णांना विविध सोयीसुविधा उपलब्ध केल्या आहेत. दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळामध्येही अत्याधुनिक उपकरणे व सुविधा उपलब्ध करण्यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करून निर्णय घेतले जातील.

जनतेला आरोग्य सेवा व सुविधा देण्याचा तसेच त्यांच्या दारापर्यंत पोहोचून त्यांचा लाभ मिळवून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

जनतेचा सरकारी इस्पितळांवर विश्‍वास असल्याने मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचारासाठी येतात. माझ्या वडिलांनी तसेच मी सुद्धा गोमेकॉत उपचार घेतले आहेत. लोकांना तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत उत्तम उपचार देण्याचा प्रयत्न आहे, असे राणे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT