Goa Crime News: सराईत गुंड सूर्यावरील प्राणघातक हल्ला प्रकरणी 2 बालगुन्हेगार अटकेत

Goa Crime News: सराईत गुंड सूर्यकात कांबळी ऊर्फ सूर्या (५५) याच्यावर पूर्ववैमनस्यातून चॉपर व सुरीने प्राणघातक हल्ला करून पसार झालेल्या दोघा अल्पवयीन हल्लेखोरांना आज पणजी पोलिसांनी अटक केली.
Goa Crime News
Goa Crime NewsDainik Gomantak

Goa Crime News: सराईत गुंड सूर्यकात कांबळी ऊर्फ सूर्या (५५) याच्यावर पूर्ववैमनस्यातून चॉपर व सुरीने प्राणघातक हल्ला करून पसार झालेल्या दोघा अल्पवयीन हल्लेखोरांना आज पणजी पोलिसांनी अटक केली.

त्यांची रवानगी मेरशी येथील ‘अपना घर’मध्ये करण्यात आली आहे. या दोघांपैकी एकाला पणजी पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली यापूर्वी अटक केली होती.

Goa Crime News
Borim Bridge: सुनावणीसाठी बोलावले; पण अधिकारीच गैरहजर

पोलिसांनी अटक केलेल्यांपैकी एकजण सांताक्रुझ येथील असून त्याला फोंडा येथून तर दुसरा ताळगावातील असून त्याला त्‍याच्‍या घरातून ताब्यात घेण्यात आले. गुंड सूर्याने ताळगावात आपली दहशत निर्माण केली होती.

अनेकांना तो जीवे मारण्याच्या धमक्या देत होता. त्यामुळे त्याचा काटा काढण्यासाठीच हा हल्ला करण्यात आल्याची कबुली या हल्लेखोरांनी दिली आहे. त्या दोघाना बालकल्याण समितीकडे सोपविण्यात आले आहे.

Goa Crime News
Dance Bar In Goa: कळंगुटमधील बेकायदेशीर डान्सबार तातडीने बंद करा

दरम्यान, या जखमी झालेला गुंड सूर्या याच्यावर गोमेकॉ इस्पितळात उपचार सुरू आहेत. हल्ल्यासाठी वापरण्यात आलेला चॉपर जप्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हल्ल्यावेळी वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती पणजी पोलिसांनी दिली.

खुनाचा प्रयत्‍न केल्‍याप्रकरणी झाली होती अटक

संशयित हल्लेखोरांविरोधात ज्युवेनाईल जस्टीस बोर्डासमोर सुनावणी होईल. यापूर्वी त्‍यातील एकाला पणजी पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक करून समितीकडे सोपविले होते.

‘अपना घर‘मध्‍ये असताना त्याने ज्युवेनाईल जस्टीस बोर्डाकडे जामिनासाठी अर्ज केला असता तो मंजूर करण्यात आल्याने तो पुन्हा गुन्हेगारी कारवायांत सक्रिय झाला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com