आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी बुस्टर डोस घेतला आहे. गोव्यात COVID-19 चा दैनंदिन आलेख किंचित वर जात आहे. याच पार्श्र्वभुमीवर आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी बुस्टर डोस घेतला आहे. दरम्यान ते म्हणाले, बुस्टर डोससाठी मी पात्र असलेल्या सर्वांना लसीकरण करण्यास आवाहन करतो; नागरीकांनी कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे.
(Health Minister Vishwajit Rane took booster dose)
कोरोनाच्या चौथ्या लाटेसाठी गोवा सज्ज!
विविध राज्यांत कोरोना संसर्ग वाढत असताना गोव्यालाही त्याची झळ बसू लागली आहे. काही दिवसांपासून संसर्गाचे प्रमाण वाढले होते. मात्र, आज त्यात कपात झाली असली तरी संसर्गाचा धोका टळलेला नाही. त्यामुळे सरकारने लोकांना सावधगिरीच्या सूचना केल्या आहेत. बाधितांची संख्या दोनशेवर गेल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. महाराष्ट्रात सार्वजनिक ठिकाणी मास्क सक्ती केली असली तरी गोव्याने अद्याप निर्णय घेतलेला नाही. पण नियमांचे पालन करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
वाढत्या कोरोनामुळे विद्यार्थी, पालक चिंतेत
राज्यात कोरोना रुग्णांची सध्या वाढायला लागल्यामुळे चौथी लाट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही लाट नवीन शालेय वर्ष सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर येत असल्यामुळे पालक व विद्यार्थी वर्गात चिंतेचे वातावरण पसरायला लागले आहे. गेली दोन वर्षे कोरोना मुळे शिक्षणक्षेत्राची बरीच हानी झालेली आहे. प्राथमिक वर्गाच्या विद्यार्थ्यांना तर शाळा म्हणजे काय हेसुद्धा माहित नाही.
कोरोनाचे रुग्ण वाढायला लागले की गदा बसते ती शिक्षणक्षेत्रावर. त्यामुळे मग ऑफलाईन वर्गांची जागा ऑनलाईन वर्ग घेताना दिसतात. पण या ऑनलाईन वर्गांचा फायद्यापेक्षा तोटाच अधिक होत असल्याने आतापर्यंतच्या अनुभवावरुन दिसून आले आहे. यामुळे गेली दोन वर्षे शिक्षणाचा खेळखंडोबा होताना दिसायला लागला आहे. मुलेही एकलकोंडी व्हायला लागली आहेत. काही मुले तर मानसिक रुग्ण होण्याच्या मार्गावर आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.