Vishwajeet Rane Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly: अधूनमधून इस्पितळे, आरोग्य केद्रांचा अचानक आढावा घेतो; आरोग्यमंत्री राणेंचा दावा

Vishwajit Rane: राज्यातील सरकारी इस्पितळे तसेच सामुदायिक व आरोग्य केंद्रात परिचारिका कर्मचाऱ्यांची नेमणूक योग्य प्रकारे होत नाही

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: गोमेकॉ इस्पितळातील परिचारिका रेफ्रिजरेटर्समध्ये औषधे ठेवण्याऐवजी त्यांचे जेवणाचे डबे ठेवत होते, याची गंभीर दखल घेतली होती. त्यामुळेच मी अधूनमधून इस्पितळे व आरोग्य केंद्रांना भेट देऊन रुग्णांना मिळणारे उपचार तसेच तेथील कामाचा आढावा घेत असतो, असे आरोग्य मंत्री विश्‍वजीत राणे यांनी विधानसभेत सांगितले.

राज्यातील सरकारी इस्पितळे तसेच सामुदायिक व आरोग्य केंद्रात परिचारिका कर्मचाऱ्यांची नेमणूक योग्य प्रकारे होत नाही. केंद्रामध्ये ईसीजी, एक्स रे तसेच लॅब तांत्रिक कर्मचाऱ्यांची गरज आहे. ऑपरेशन थिएटरचा वापर होण्यासाठी डॉक्टरांची गरज आहे. केंद्रात असलेली ऑपरेशन थिएटर्स सुरू करण्यासाठी भूलतज्ञांची कमतरता आहे.

त्यामुळे किरकोळ शस्त्रक्रिया करणे शक्य होत नाही, असे राणे म्हणाले. डिचोली सामुदायिक आरोग्य केंद्रातील ऑपरेशन थिएटरचे गोदाम बनले आहे, ही गंभीर बाब आहे. बाह्यरुग्ण विभागात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या ४५०० वरून ६५०० वर गेली आहे, असे युरी आलेमाव म्हणाले.

...तर रुग्ण वाढतील!

जिल्हा इस्पितळावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी सरकारने सामुदायिक तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रे अधिक सक्षम करायला हवी. आवश्‍यक डॉक्टर्स, परिचारिका तसेच तांत्रिक कर्मचारी वर्गाची नियुक्ती करायला हवी. असे न केल्यास रुग्ण जिल्हा व गोमेकॉ इस्पितळांकडे वळतील व या इस्पितळांवर मोठा ताण येईल, असे आमदार दिगंबर कामत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Consumer Commission: मुदतवाढ नाकारल्याने दक्षिण गोवा ग्राहक आयोगाचे माजी अध्यक्ष कोर्टात! 'अन्याय’ झाल्याचा केला दावा

Teachers Pending Salary: 458 शिक्षक-कर्मचाऱ्यांचा थकीत पगार कधी मिळणार? सरदेसाईंचं मुख्य सचिवांना पत्र; तात्काळ वेतनाची केली मागणी

Curchorem Drug Capital Goa: कुडचडे गोव्याचं 'ड्रग कॅपिटल'? अमित पाटकरांचा सरकारवर हल्लाबोल; अमली पदार्थांविरोधात निर्णायक कारवाईची केली मागणी

Viral Video: भरधाव राजधानी एक्सप्रेस अन् समोर हत्तींचा कळप! देवदूत बनून आला वन रक्षक; थोडक्यात काळाचा घाला टळला

ISRO Space Sector Reforms: 'इस्रो'चं खासगीकरण नाही, तर जबाबदारीचं नव्यानं वाटप! 2020 नंतर स्पेस इकॉनॉमीला वेग; नव्या अवकाश धोरणानं बदलली भारताची दिशा

SCROLL FOR NEXT