Goa Assembly: वायनाडमधील दुर्घटनेमुळे सर्वांचे डोळे उघडले; मुख्यमंत्री सावध

CM Pramod Sawant On Landslide: यापुढे डोंगरकापणी होऊ देणार नाही; आपत्ती व्यवस्थापनाला सूचना
CM Pramod Sawant On Landslide: यापुढे डोंगरकापणी होऊ देणार नाही; आपत्ती व्यवस्थापनाला सूचना
Cm Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यात यापुढे बेकायदा डोंगर कापणी होऊ देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज विधानसभेत दिली. वायनाड येथील भूस्खलन हे सगळ्यांचे डोळे उघडणारे आहे. ‘इस्त्रो’च्या अहवालात वायनाडसोबत गोव्याचाही उल्लेख होता, असे ते म्हणाले. ते म्हणाले की, मी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला सूचना दिल्या आहेत की, भूस्खलन प्रवण क्षेत्रांमध्ये कामे होऊ नयेत.

पाड्डीत डोंगर कापून उभारले सभागृह

या विषयावरील चर्चेत सहभागी होताना युरी आलेमाव म्हणाले, पाड्डी येथे डोंगर कापून सभागृह बांधले आहे. विशेष म्हणजे, दहा वर्षांपूर्वी मरण पावलेल्या व्यक्तीच्या नावाने असलेल्या अधिकारपत्राच्या आधारे हे सारे केले आहे. मुख्यमंत्र्यांना त्या सभागृहाच्या उदघाटनासाठी निमंत्रित करण्यात येणार आहे. अशा गोष्टींवर सरकार कारवाई करणार नसेल तर डोंगर कापणी थांबणार नाही. सरकारने याकडे राजकीय चष्म्यातून पाहू नये.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Dhangar Community ST Status
Goa Police Recruitment
Pramod Sawant Convoy Accident
home minister amit shah reviews goa st reservation file
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com