Health Minister Vishwajit Rane  Dainik Gomantak
गोवा

Vishwajit Rane: मोफत IVF उपचार करणारे गोवा ठरणार पहिले राज्य; 100 हून अधिक दाम्पत्यांनी केली नोंदणी

Akshay Nirmale

Vishwajit Rane: गोवा हे IVF (इन विट्रो फर्टिलायझेशन) उपचार मोफत करणारे पहिले राज्य ठरणार आहे. गेल्या काही काळात आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांच्या प्रयत्नांतून बांबोळी येथील गोवा मेडिकल कॉलेज रूग्णालयात ही सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. आता या IVF उपचारांसाठी 100 हून अधिक दाम्पत्यांनी नोंदणी केली आहे.

मंत्री विश्वजीत राणे यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, गोवा हे पालक बनू इच्छिणाऱ्या दाम्पत्याला मोफत IVF उपचार देणारे भारतातील पहिले राज्य बनणार आहे.

कोणत्याही दाम्पत्याला पालकत्वाचा आनंद नाकारला जाणार नाही, याची खात्री करण्यासाठी अत्यावश्यक वैद्यकीय सुविधा पुरविण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. या उपक्रमासाठी 100 हून अधिक दाम्पत्यांनी नोंदणी केली आहे. हा अग्रगण्य कार्यक्रम IVF प्रवेश योग्य आणि विनामूल्य बनवतो.

या उपचारांसाठी सामान्यत: 5 लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च येतो. या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जोडप्यांना वंध्यत्वावर मात करणे आणि पालकत्व प्राप्त करणे शक्य आहे.

काही दाम्‍पत्‍यांना एक अपत्य झाल्यानंतर दुसरे अपत्य होण्यास विलंब लागतो. अशी दाम्‍पत्‍येही या सुविधेचा लाभ घेऊ शकतील.

या दाम्पत्यांना आधी प्रसूती व स्त्रीरोगशास्त्र विभागातील डॉक्टरांना भेटावे लागेल. डॉक्टर या इच्छुक दाम्‍पत्यांमधून कोणत्या दाम्‍पत्‍याला अपत्याची तातडीने गरज आहे, कोणावर हे उपचार प्रभावी ठरू शकतात आदी घटकांच्या आधारे उपचारांसाठी यादी तयार करतील. त्या यादीनुसार उपचार केले जातील. त्यासाठी कोणताही खर्च घेतला जाणार नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: बेपत्ता सुभाष वेलिंगकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज!

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT