Vishwajit Rane Dainik Gomantak
गोवा

First Aid Training: प्रथमोपचारक व्हा, प्राण वाचवा; मंत्री विश्‍वजीत राणे

वाळपईत प्रथमोपचार कार्यशाळेचा केला समारोप

दैनिक गोमन्तक

धकाधकीच्या जीवनशैलीमुळे सध्या हृदयविकारासारख्या काही गंभीर आजारांचे प्रमाण वाढत आहे. हृदयविकार किंवा अपघातांवेळी वेळीच उपाचार झाले तर रुग्णांचे प्राण वाचता येतात. त्यासाठी प्रत्येक सुजाण नागरिकाने ‘प्रथमोपचार प्रशिक्षण’ घेऊन प्रथमोपचारक होणे आवश्यक आहे, असे आवाहन आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी केले.

कम्युनिटी हेल्थ सेंटर, वाळपई आणि जीवीके एमरी ग्रीन हेल्थ सर्विसेसच्या संयुक्त विद्यमाने वाळपई आरोग्य केंद्रात आयोजित प्रथमोपचार प्रशिक्षणाच्या समारोप कार्यक्रमात राणे बोलत होते. यावेळी आरोग्य खात्याच्या डॉ. गीता काकोडकर, जीवीके एमरी ग्रीन हेल्थ सर्विसेसच्या संचालीका सुषमा सेनी, वाळपईचे आरोग्याधिकारी डॉ. विकास नाईक, आरोग्याधिकारी डॉ. श्याम काणकोणकर, नगराध्यक्षा प्रसन्ना गावस आदींची उपस्थिती होती.

राणे पुढे म्हणाले की, आरोग्य क्षेत्रात राज्यात क्रांती घडली आहे. प्रगत आरोग्य सुविधा राज्यात उपलब्ध आहेत. आता रोबोटिक शस्त्रक्रिया किंवा सॅटेलाइट ओपीडीमुळेही रुग्णांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न आहे, असे राणे यांनी सांगितले.

राज्यात सुरू होणाऱ्या कॅन्सर इस्पितळात चांगली सेवा उपलब्ध व्हावी तसेच येथे काम करणाऱ्या परिचारिकांना चांगल्या पध्दतीचे प्रशिक्षण मिळावे यासाठी १० परिचारिकांना मुंबई येथे खास प्रशिक्षण घेण्यासाठी पाठविण्यात आले आहे, याचा फायदा रुग्णांना होईल, असे राणे यांनी सांगितले.

नगराध्यक्षा प्रसन्ना गावस म्हणाल्या की, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्यामुळे राज्यात आरोग्य सेवा प्रगत झाली आहे. सामान्यातील सामान्य माणसांना चांगली आरोग्य सेवा मिळत आहे.

डॉ. गीता काकोडकर यांनी प्रथमोपचार संबंधी सविस्तर माहिती दिली. तसेच राज्यभरात प्रथमोपचार प्रशिक्षणाला चांगला प्रतिसाद लाभत असल्याचे सांगितले.

स्वागत डॉ. विकास नाईक यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. वैभव गाडगीळ यांनी केले. आभार डॉ. श्याम काणकोणकर यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT