Vishwajeet rane  Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Monsoon Session 2024: तरुणांच्या ‘मेंदूत रक्तस्त्राव’च्या वाढत्या तक्रारी; ‘गोमेकॉ’त पेटस्कॅन-मॅमोग्राफी लवकरच उपलब्ध

Goa Legislative Assembly Monsoon Session 2024: बदलत्या जीवनशैलीमुळे २० ते ३५ वयोगटातील तरुण मेंदूत रक्तस्राव होत असल्याच्या तक्रारी घेऊन ‘गोमेकॉ’त येत आहेत अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी दिली

गोमन्तक डिजिटल टीम

बदलत्या जीवनशैलीमुळे आता २० ते ३५ वयोगटातील तरुण मेंदूत रक्तस्राव होत असल्याच्या तक्रारी घेऊन ‘गोमेकॉ’त येऊ लागले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी आज(गुरुवारी) विधानसभेत दिली. ‘गोमेकॉ’त मध्ये पेटस्कॅन आणि मॅमोग्राफी यंत्र लवकरच उपलब्ध केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

याविषयीचा प्रश्‍न वेळ्ळीचे आमदार क्रुझ सिल्वा यांनी विचारला होता. ते म्हणाले दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात रेडिओलॉजी विभागातील यंत्रणा चालत नसल्याने रुग्णाला खाजगी इस्पितळात पाठवण्यात आले. त्या खासगी इस्पितळाने, रुग्णाने शुल्क भरले नाही म्हणून वैद्यकीय अहवालच दिला नाही. या परिस्थितीत रुग्णाचे शुल्क सरकार भरणार आहे का. रेडिओलॉजी विभागातील काही यंत्रणा बंद पडली तर सरकारकडे काय पर्यायी यंत्रणा आहे.

आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, गोमेकॉतील काही नादुरुस्त यंत्रणा दुरुस्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तेथे नवीन यंत्र घेण्याचा निर्णय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येतो. गोमेकॉच्या रेडिओलॉजी विभागात रुग्ण जास्त असतील तर तेथेच असलेल्या ‘रेडियन्स डायग्नोस्टिक्स’ कडे करार केलेला आहे, तेथे रुग्ण पाठवले जातात, मात्र चार वर्षात केवळ ३१० रुग्ण तेथे पाठवले गेले आहेत.

‘एमआरआय’साठी ४० मिनिटे लागतात यामुळे यंत्रे किती वाढवावीत, याचाही विचार करावा लागतो. तंत्रज्ञ आणि मनुष्यबळ यांची सांगड घालून इस्पितळ चालवावे लागते. केवळ इस्पितळासाठी मोठी इमारत बांधून चालत नाही तर यंत्रे उपकरणे आणि तंत्रज्ञ लागतात.

ते म्हणाले दर आठवड्याला आम्ही सगळ्या यंत्रणेचा आढावा घेतो. सगळी यंत्रणा कार्यवाहीत राहावी, असे प्रयत्न असतात.

‘गोमेकॉ’त मॅमोग्राफी यंत्र बंद!

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले, आपत्कालीन उपचार कक्षात रुग्ण संख्या वाढल्याने तेथील यंत्रणेवर ताण येतो. काही वेळेला हृदयविकाराच्या रुग्णावर पहिल्या तासातच कोणते उपचार करावे हे ठरवावे लागते. त्यासाठी आवश्यक ती उपकरणे आपत्कालीन उपचार कक्षाच्या आजूबाजूलाच उपलब्ध करावी लागतात. त्याची सोय व वैद्यकीय महाविद्यालयात केली गेली पाहिजे. डिचोलीचे आमदार चंद्रकांत शेटये यांनी गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील मॅमोग्राफी यंत्र बंद असल्याकडे सरकारचे लक्ष वेधले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT