Sewage Spills from drains at St. Inez Sandip Desai
गोवा

Panaji Smart City: वाहतूक कोंडीला सांडपाणी समस्येची जोड; महापालिकेच्या कामावर प्रश्‍न

सांतिनेजमधील नागरिकांची ससेहोलपट कायम; रस्ता चिखलमय

दैनिक गोमन्तक डिजिटल

Panaji Smart City: सांतिनेजमधील समस्या काही थांबण्याचे नाव घेत नाही. मलनिस्सारण वाहिनी टाकण्याच्या सुरू असलेल्या कामामुळे वाहतूक कोंडीला अगोदरच येथील नागरिक तोंड देत आहेत.

आता त्या भागातील गटारांची साफसफाई न केल्याने सांडपाण्याचे चेंबर भरल्यामुळे गटारातून पाणी मलनिस्सारण वाहिनीच्या चेंबरसाठी खोदलेल्या खड्ड्यांमध्ये गेले आहे. त्यामुळे येथून ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांना सांडपाण्याच्या घाण वासामुळे नाकावर हात ठेवून ये-जा करावी लागत आहे.

सांतिनेजमधील एका व्यावसायिकाने सांगितले की, रस्त्याच्या बाजूला पदपथावर असलेला सांडपाण्याचा चेंबर भरून वाहत आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून महानगरपालिकेला याबाबत कळवूनही काहीच उपाय झालेले नाहीत.

अखेर खड्डे भरल्याने येथील नगरसेविकेला कळविण्यात आले आहे. पाण्याने जे खड्डे भरलेले आहेत, ते खचण्याची भीती आहे.

अगोदरच या खोदलेल्या खड्ड्यांच्या बाजूने जाणारी अनेक अवजड वाहने रस्ता खचून त्या ठिकाणी अडकल्याच्या घटना घडलेल्या आहेत. या घटना पाहता येथे सुरक्षाव्यवस्था करणे आवश्‍यक आहे.

खड्ड्यांतून पाणी उपसा झाल्यावर या खोदलेल्या खड्ड्यांच्या कडा टिकून राहतील याची शाश्‍वती नाही. सांतिनेजमध्ये मलनिस्सारणाची वाहिनी टाकण्याचे काम कंत्राटदाराची मोठी डोकेदुखी ठरली आहे.

सांडपाणी रस्त्यावर आल्याने सध्या या परिसरात दुर्गंधी आणि चिखलमय रस्त्याचाही त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.

मूळ समस्या चेंबरची

रस्त्याच्या बाजूला असणारे गटार खोलवर नाही, त्यामुळे ते लवकर भरते. मूळ समस्या चेंबरची असून, ती सुटणे आवश्‍यक असल्याचे स्पष्ट दिसते.

तर गटाराच्या पलीकडील बाजूस जे पाणी वाहून जाते, ते खड्ड्यातून नेमके कोठे जाते? हे काही समजत नाही. त्यामुळे महानगरपालिकेला सध्या साबांखा किंवा स्मार्ट सिटीच्या माथी ही समस्या टाकता येणार नाही.

‘महापौर’ जरा लक्ष द्या : सिसील

पणजीतील सांतिनेज परिसरात काकुलो मॉल ते शीतल हॉटेलदरम्यानच्या रस्त्यावर पाण्याची वाहिनी चार ते पाच दिवसांपूर्वी फुटली आहे. या वाहिनी फुटलेल्या प्रकाराकडे कोणी पाहत नाही.

वाहिनीतून पाणी वाहून ते रस्त्यावर येऊन रस्ता चिखलमय झाला आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वीच उन्हाळ्यात चिखलातून वाहनधारकांना वाहने हाकावी लागत आहेत.

हा रस्ता वाहनधारकांसाठी सुरक्षित नाही, त्यामुळे याकडे महापौर लक्ष देतील काय? असा सवाल विचारणारा आम आदमी पक्षाच्या सिसील रॉड्रिग्स यांचा व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT