Goa Health |Hospital Dainik Gomantak
गोवा

Goa Health: मुळगावात 150 खाटांचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल; ‘ईएसआय’च्या बैठकीत निर्णय

मुळगाव-डिचोली येथे 150 खाटांचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय ईएसआयने घेतला आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Health: मुळगाव-डिचोली येथे 150 खाटांचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय कर्मचारी राज्य विमा (ईएसआय) गोवा विभागाच्या प्रादेशिक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

मजूर आणि रोजगार मंत्री बाबूश मोन्सेरात यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी मंडळाची 52 वी बैठक पार पडली. या बैठकीसाठी महसूल सचिव संदीप जॅकिस, आयुक्त राजू गवस, ख्रिस्तोफर फोन्सेका, तसेच विविध कामगार संघटनांचे नेते तथा मंडळाचे सदस्य उपस्थित होते. या बैठकीत ईएसआय सोसायटीची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला.

ईएसआयच्या योजनेद्वारे गोमेकॉ किंवा इतर हॉस्पिटलमध्ये, तसेच डायग्नोस्टिक केंद्रांमध्ये कॅशलेस सेवा पुरविण्यावर विचार करण्यात आला. मुळगावातील इस्पितळ उभारणीच्या कामाला येत्या दोन महिन्यांत सुरुवात करण्यात येणार असून, ते काम दोन वर्षांत पूर्ण होणार आहे.

त्याशिवाय मंडळावर जैव वैद्यकीय अभियंता तसेच सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अर्धवेळ डॉक्टरांची नेमणूक करण्यावर चर्चा करण्यात आली. वेर्णा औद्योगिक वसाहतीमध्ये ईएसआयच्या ओपीडीचे स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचा फायदा औद्योगिक वसाहतीतील कर्मचाऱ्यांना होईल, असे मोन्सेरात यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim Water Crisis: गोव्यातील 'या' भागावर घोंघावतेय पाणीसंकट! जलवाहिनी गळतीमुळे वाढला धोका; हजारो लिटर पाणी वाया

VIDEO: गोव्यात रशियन कुटुंबाकडून बेकायदेशीर 'टॅक्सी व्यवसाय'; यांना कोणाचा 'आशीर्वाद'? स्थानिकांचा सवाल

Mormugao Port: मोठी बातमी! मुरगाव बंदरात कंटेनर व्यवसाय सुरू, SCI जहाज दाखल; ‘एमपीए’बरोबरच राज्यालाही होणार लाभ

Konkani Drama Competition: 'हा कोकणी लेखकांचा अनादर, नाट्य चळवळीला मारक'; राज्यनाट्य स्पर्धा आणि वादांचे साद-पडसाद

Horoscope: धन, यश आणि प्रगती! नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात 3 राशींसाठी महायोग, वाचा तुमचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT