Mayem Mahamaya Dainik Gomantak
गोवा

Mayem Mahamaya: कळसोत्सवावरून दोन गटात वाद! पोलिस बंदोबस्तात मये महामाया देवस्थानचा कळस खोलीबंद

मयेतील कळस उत्सवाला मंगळवारी मध्यरात्री तणावाचे गालबोट लागले.

गोमंतक ऑनलाईन टीम

गोंधळ आणि किरकोळ तणावानंतर सुरळीतपणे साजरा होत असतानाच, मयेतील कळस उत्सवाला काल (मंगळवारी) मध्यरात्री तणावाचे गालबोट लागले. परिणामी कळसोत्सव अर्ध्यावरच बंद ठेवण्यात आला. देवीचा कळस घरोघरी फिरत असतानाच, काल मध्यरात्री कळसोत्सवावरून दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला. अधिकाराच्या मुद्यावरून एका गटाने कळस गावात फिरवण्यास तीव्र आक्षेप घेतल्यानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता निर्माण होताच, पोलिस बंदोबस्तात देवीचा कळस अखेर श्री महामाया मंदिरात नेण्यात आला.

Mayem Mahamaya

देवीचा कळस सध्या मंदिरातील गर्भकुडीत बंदावस्थेत ठेवण्यात आला असून, त्याठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. घरोघरी भेट दिल्यानंतर येत्या शनिवारी (ता.4) रोजी श्री महामाया मंदिरात कौलोत्सव साजरा होवून या उत्सवाची सांगता होणार होती. पण त्याआधीच हा उत्सव बंद करावा लागल्याने देवीचा कळस आमच्या घरी कधी येणार, त्याची उत्सुकता लागून राहिलेल्या भाविकांची मात्र घोर निराशा झाली आहे.

वादाची पार्श्वभूमी

मान आणि अधिकाराच्या मुद्यावरून मयेतील कळसोत्सव गेल्या काही वर्षांपासून वादात अडकला आहे.कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून 2019 साली कळसोत्सवासह माल्याची जत्रा आदी प्रमुख उत्सव देवालय प्रशासकाकडून निलंबीत करण्यात आले होते. 2020 सालीही कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून शेवटच्या क्षणी कळसोत्सव निलंबीत करण्यात आला होता. मात्र नंतर उच्च न्यायालयाने परब समाजाला कळसोत्सव साजरा करण्याची मोकळीक दिल्यानंतर त्यावर्षी 7 मार्च रोजी एकाच दिवशी सशस्त्र पोलिस बंदोबस्तात कळसोत्सव साजरा करण्यात आला होता. गेल्या दोन वर्षी मात्र किरकोळ अपवाद वगळता न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिस बंदोबस्तात कळसोत्सव साजरा करण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karul Ghat Landslide: गणेशभक्तांना फटका! करुळ घाटात दरड कोसळली; परतीचा प्रवास ठप्प

गोव्यातील BITS Pilani पुन्हा हादरलं! आणखी एका विद्यार्थ्याने आयुष्य संपवलं; वर्षातील पाचवी घटना

Viral Video: पाण्याचा ग्लासच नाही बसलेली खुर्ची- टेबलही पुसलं, पुतिन भेटीनंतर 'पुरावे नष्ट'; किम जोंगना वाटतेय DNA चोरीची भीती?

GCA: 'जीसीए' निवडणुकीत 6 जागांसाठी 46 अर्ज! माजी सभापती पाटणेकरही रिंगणात; देसाईंना आव्हान

Goa Live News: बिट्स पिलानीमध्ये आणखी एका विद्यार्थ्याने संपवले जीवन

SCROLL FOR NEXT