Banastarim Accident Dainik Gomantak
गोवा

Banastarim Accident: अपघातसत्र सुरूच; बाणास्तरी येथे दुचाकींची समोरासमोर धडक, युवकाचा जागीच मृत्यू

राज्यात गेल्‍या 9 दिवसांत विविध अपघातात 10 जणांचा मृत्‍यू झाला आहे.

Pramod Yadav

Banastarim Accident News: गोव्यात अपघातसत्र सुरूच असून, बाणास्तरी येथे दुचाकींची समोरासमोर धडक होऊन युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. आज (मंगळवार, दि.02) पहाटे बाणास्तरी पूलाजवळ हा अपघात झाला.

या अपघातात एक दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला असून, एक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

(Head on collision of scooters at Banastarim youth died while overtaking a bus)

मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकी चालक बसला ओव्हरटेक करत असताना, समोरून येणाऱ्या दुचाकीसोबत समोरासमोर धडक झाली.

यात एका दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, सोमवारी राज्यात अपघातांची नोंद झाल्यानंतर मंगळवारी देखील पहाटेच अपघात झाला आहे.

दरम्यान, राज्यात गेल्‍या 9 दिवसांत विविध अपघातात 10 जणांचा मृत्‍यू झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rajpal Yadav Cheque Bounce Case: चेक बाऊन्स प्रकरणी राजपाल यादवला सुप्रीम कोर्टाचा झटका; 13 ऑक्टोबरपर्यंत 2 कोटी रुपये जमा करण्याचे निर्देश

SIR Allegation: 'मतदारांची नावे रद्द करणे हे कटकारस्थान'; सरदेसाईंचा आरोप, दवंडेतील एकाच कुटुंबातील सहा नावे वगळल्याचे उघड

Abhinav Tejarana Captaincy: स्नेहलनंतर अभिनवकडे गोव्याच्या रणजी संघाची धुरा? 7 सामन्यांत 788 धावांचा पाऊस; कर्णधारपदासाठी तेजराणा आघाडीवर

America Visa: भारतीय आयटी प्रोफेशनल्ससाठी महत्त्वाची अपडेट! H-1B व्हिसा नियम मोडणाऱ्या कंपन्यांना 2.4 कोटींच्या दंडासह 10 वर्षांचा बॅन; नव्या विधेयकाने खळबळ

Goa Agriculture: डिचोलीत बळीराजाच्या नजरा आभाळाकडे! भातपीक कणसे धरण्याच्या टप्प्यावर, दमदार पाऊस गायब; हातातोंडाशी आलेला घास करपण्याची भीती

SCROLL FOR NEXT