Marna-Siolim Car Accident: Dainik Gomantak
गोवा

Siolim Car Accident: मारणा-शिवोलीत भरधाव कार-मोपेड स्कुटरची समोरासमोर धडक; दोन्ही ड्रायव्हर गंभीर जखमी

म्हापसा रस्त्यावर अपघात

गोमंतक ऑनलाईन टीम

Siolim Car Accident: उत्तर गोव्यातील मारणा-शिवोली येथे गुरूवारी रात्री वॅगनआर कार (GA 06 D1751) आणि अॅक्टिव्हा स्कूटर (GA03 AD 7564) या दोन वाहनांमध्ये भीषण अपघात झाला. म्हापसा रस्त्यावर या दोन वाहनांमध्ये समोरासमोर धडक झाली.

मोपेडचालक शिवोलीच्या दिशेने जात होता. तर वॅगन आर कारचालक म्हापसाच्या दिशेने येत होता.

कारच्या धडकेने अॅक्टिव्हा रस्त्याकडेला जाऊन पडली होती. तर कार इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर आणि 11KV क्षमतेच्या विद्युत खांबावर आदळली. यात दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. दुर्दैवाने, कार आणि स्कूटरच्या दोन्ही चालकांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना तात्काळ वैद्यकीय उपचारासाठी म्हापसा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa ZP Election: पैंगीणमध्‍ये तिरंगी लढतीची शक्‍यता! राजकीय समीकरणे बदलू लागली; प्रचारात गोवा फॉरवर्डची आगेकूच

Porvorim: सर्वत्र धूळच धूळ! पर्वरी महामार्गावरील वाढती समस्या; वाहनचालकांसाठी प्रवास त्रासदायक

Tivrem Vargao: 2 गटांत रंगली चुरस! तिवरे–वरगावात सत्तासंघर्षाचा विस्फोट; सरपंच–उपसरपंचांवरील अविश्वास ठराव मंजूर

Horoscope: प्रॉपर्टी होणार नावावर, कामासाठी होणार प्रवास; 'या' राशींसाठी आजचा दिवस खास

IFFI 2025: 'इफ्फी' परेडमुळे पणजीत अर्धा दिवस सुट्टी! सरकारी कार्यालये आणि स्वायत्त संस्था दुपारनंतर बंद

SCROLL FOR NEXT