Pratap singh Rane  Dainik Gomantak
गोवा

प्रतापसिंग राणेंच्या कॅबिनेट दर्जाला आव्हान देणारी याचिका अखेर दाखल

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दाखल करुन घेतली; 2 मे रोजी सुनावणी

दैनिक गोमन्तक

पणजी : माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते प्रतापसिंग राणे यांच्या आजीवन कॅबिनेट पदाच्या दर्जाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दाखल करुन घेतली आहे. अॅड. आयरीश रॉड्रिग्स यांनी ही याचिका उच्च न्यायालयात दाखल केली असून याचिकेवर 2 मे रोजी सुनावणी होणार आहे.

माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे (Pratapsingh Rane) यांचा राजकारणातील अनुभव आणि राजकारणात 50 वर्षे पूर्ण केल्याने भाजप सरकारने 7 जानेवारी रोजी त्यांना आजीवन कॅबिनेट दर्जा देण्याची अधिसूचना जारी केली होती. ही अधिसूचना आणि राज्य सरकारचा (Goa Government) निर्णय घटनेचे उल्लंघन करणारा असल्याचा दावा ॲड. आयरिश रॉड्रिग्स यांनी करून तो रद्द करण्याची विनंती याचिकेत केली होती. याचिकेत रॉड्रिग्स यांनी राज्य सरकार आणि 83 वर्षीय प्रतापसिंह राणे यांना प्रतिवादी केले होते.

भारतीय घटनेत विद्यमान मंत्र्यांव्यतिरिक्त इतर कोणालाही कॅबिनेट दर्जा देण्याची तरतूद नाही. पूर्वी मंत्री असलेल्यांना कॅबिनेट दर्जा वैयक्तिपणे देता येत नाही. घटनेच्या कलम 164 नुसार मंत्रिमंडळातील संख्या मुख्यमंत्र्यांसह 12 पेक्षा अधिक होऊ नये. प्रतापसिंह राणे यांना कॅबिनेट दर्जा दिल्याने हे संख्याबळ 13 मंत्र्यांचे होते, ज्याला भारतीय घटनेत मान्यता नाही. हे संख्याबळ मान्यतेपेक्षा अधिक होते. राज्यात जंबो मंत्रिमंडळ नसावे, यासाठी राज्यघटनेत मंत्रिमंडळ विस्तारावर निर्बंध घातले आहेत. सरकारने आणखी एका मंत्र्याला (Minister) कॅबिनेट दर्जा देऊन करदात्यांवरील बोजा वाढविला आहे. कायद्याचा अपमान करून मागील दाराने राणे यांना हा दर्जा दिला आहे, असे रॉड्रिग्स यांनी याचिकेत नमूद केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: मंदिरात दर्शन घेऊन बाहेर आला अन् गर्दीत चप्पल गायब! गोव्याच्या पठ्ठ्यानं थेट 'ChatGPT'ची घेतली मदत; काही क्षणांत... पाहा व्हायरल व्हिडिओ

राजकारणात खळबळ! पक्षाच्या कार्यालयात लटकलेल्या अवस्थेत आढळला नेत्याचा मृतदेह; सुसाइड नोटमध्ये लिहिलं, 'राजकारणात आलो, हीच मोठी चूक'

ICC ODI World Cup 2027: अखेर ठरलं! वनडे वर्ल्ड कपचा थरार 'या' तारखेपासून रंगणार; अंतिम सामन्याचीही तारीख निश्चित

Horoscope: रविवार ठरणार खास! वृषभ-कर्कसह 'या' राशींवर लक्ष्मीची कृपा, घरात सुख-समृद्धी अन् नोकरीत प्रमोशनचे संकेत

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT