Suleman Khan Goa Police Custody Escape Case
पणजी: जमीन हडप प्रकरणातील सराईत आणि इतर गुन्ह्यातील पाहिजे असलेला संशयित आरोपी सिद्दीकी उर्फ सुलेमान खानला हुबळीत मदत करणाऱ्या, हजरतसाब बवन्नवार ऊर्फ हजरत अली याला पणजी कोर्टाकडून पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सुलेमान खानला हूबळीतून पळून जाण्यास हजरतने मदत केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. गुन्हे शाखा आणि जुने गोवा पोलिसांनी हजरतला शनिवारी (१४ डिसेंबर) रात्री हुबळीतून अटक केली होती.
गोव्यातील जमीन हडप प्रकरणातील मास्टरमाईंड सुलेमान खान शुक्रवारी पहाटे अडीचच्या सुमारास गुन्हे शाखेच्या पोलिस कोठडीतून फरार झाला. खानला कोठडीतून बाहेर काढण्यास आयआरबी कॉन्स्टेबल अमित नाईक याने मदत केली. एवढेच नव्हे तर त्याला दुचाकीवर बसवून पुढे हुबळीपर्यंत पोहोचवले. घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी सुलेमान आणि अमितची शोधाशोध सुरु केली. दरम्यान, अमित नाईक हुबळीत पोलिसांना शरण आला. शरण आलेल्या अमितला गोव्यात आणून सेवेतून बडतर्फ करण्यात आले.
दरम्यान, हुबळीत पोहोचलेल्या सुलेमान खानला हजरतसाब बवन्नवार ऊर्फ हजरत अली याने मदत केल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी हजरत अलीला अटक केल्यानंतर पणजी कोर्टाने आता त्याला पाच दिवसांची कोठडी सुनावली आहे. हजरतच्या अटकेने सुलेमान हुबळीतून पसार झाल्याने स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हजरतकडून सुलेमानचा पत्ता मिळणार का? हे पाहणं आता महत्वाचे ठरणार आहे.
बडतर्फ अमित नाईकलाही चार दिवसांची कोठडी
सुलेमान खानला कोठडीतून फरार होण्यास मदत करणे तसेच, पुढे दुचाकीवरुन घेऊन जाणाऱ्या कॉन्स्टेबलला सेवेतून बजतर्फ करण्यात आले. नाईकला पणजी कोर्टासमोर हजर केले असता त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सुलेमानला लवकरच पुन्हा अटक केली जाईल; मुख्यमंत्री डॉ. सावंत
सुलेमान खानला कोठडीतून फरार होण्यास मदत केलेल्या आयआरबी कॉन्स्टेबलला अटक करुन सेवेतूनही बडतर्फ करण्यात आले. तसेच, सुलेमानच्या अटकेसाठी पोलिस शोधकार्य करत आहेत. लवकरच सुलेमान खानला अटक करण्यात येईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.