Belgaum Goa transport news Dainik Gomantak
गोवा

Belgaum Goa Highway: अर्धवट हत्ती ब्रिजचं काम सुरु होणार; बेळगाव-गोवा महामार्गावरील 'हा' रास्ता मार्ग दीड महिना बंद

Belgaum Goa Highway Closed: अर्धवट स्थितीत असलेल्या 'हत्ती ब्रिज'चे काम लवकरच सुरू होणार असून, त्यासाठी हा मार्ग पुढील अडीच महिन्यांसाठी पूर्णपणे बंद ठेवला जाण्याची शक्यता

Akshata Chhatre

Belgaum Goa Highway Closed: बेळगाव-गोवा महामार्गावरील खानापूर ते अनमोड दरम्यान सुरू असलेल्या चौपदरीकरणाच्या कामामुळे वाहनधारकांना पुन्हा एकदा मोठा त्रास सहन करावा लागण्याची शक्यता आहे. या मार्गावर अर्धवट स्थितीत असलेल्या 'हत्ती ब्रिज'चे काम लवकरच सुरू होणार असून, त्यासाठी हा मार्ग पुढील अडीच महिन्यांसाठी पूर्णपणे बंद ठेवला जाण्याची शक्यता आहे. यामुळे गोवा-कर्नाटक दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

ब्रिजच्या रुंदीवरून निर्माण झालेला वाद मिटला

बेळगाव-गोवा महामार्गावरील अनमोडजवळील 'हत्ती ब्रिज'चे काम गेल्या अनेक दिवसांपासून थांबले होते. या पुलाची रुंदी फक्त सहा मीटर ठेवण्यात येणार असल्याने अनेक सामाजिक संघटनांनी यावर आक्षेप घेतला होता.

यामुळे हे काम थांबले होते. परंतु, आता राष्ट्रीय महामार्ग (NH) विभागाने या पुलाची रुंदी ९ मीटर करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे या पुलाच्या कामाला आता पुन्हा गती मिळणार आहे.

वाहनधारकांची निराशा

काही दिवसांपूर्वीच गोव्याच्या हद्दीतील काम पूर्ण झाल्याने वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला होता. परंतु, आता हा 'हत्ती ब्रिज'चे काम सुरू होणार असल्याने आणि त्यासाठी हा मार्ग पुन्हा बंद राहणार असल्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. या मार्गावरील वाहतूक इतर पर्यायी मार्गांनी वळवली जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे, ज्यामुळे प्रवासाचा वेळ वाढणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT