IAS Jyoti Kumari And IAS Asvin Chandru Dainik Gomantak
गोवा

South Goa Collector: सक्तीची वर्गणी गोव्याच्या जिल्हाधिकारी ज्योती कुमारी यांना भोवली, तडकाफडकी बदलीचे आदेश

ज्योती कुमारी यांची मनोरंजन सोसायटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती

सुशांत कुंकळयेकर

South Goa Collector: प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी सरकारी कर्मचाऱ्यांकडून 1 हजार रुपयांची वर्गणी जमा करण्याचा वादग्रस्त आदेश जारी करणाऱ्या दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी ज्योती कुमारी यांची एका आदेशान्वये तडकाफडकी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी आश्विन चंद्रू ए. यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आज सायंकाळी उशिरा पर्सनल खात्याचे अव्वल सचिव एहांत सावंत यांनी राज्यपालांच्या वतीने हा आदेश जारी केला. ज्योती कुमारी यांची सध्या गोवा मनोरंजन सोसायटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

कुमारी यांनी हा वर्गणी गोळा करण्याचा आदेश जारी केला होता. हा आदेश समाज माध्यमावर व्हायरल झाल्यावर एक मोठा गदारोळ माजला होता. महसूल मंत्री बाबुश मोंसेरात यांनी या प्रकारा बद्दल तीव्र नाराजी व्यक्त करताना कुमारी यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले होते.

प्रजासत्ताक दिनाचा कालचा सोहळा पार पडल्यावर आज तडकाफडकी हा आदेश जारी करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT