Goa Power Cuts Dainik Gomantak
गोवा

Goa Power Cuts: हसापूर, हणखणेतील वीज समस्या सोडवा; काँग्रेस कार्यकर्त्यांची वीज कार्यालयावर धडक, साहाय्यक अभियंत्यांशी चर्चा

Power Outage Crisis: हसापूर, हणखणे, इब्रामपूर व लगतच्या परिसरात वीज खंडित होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने वीज ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पेडणे: हसापूर, हणखणे, इब्रामपूर व लगतच्या परिसरात वीज खंडित होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने वीज ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या संदर्भात काँग्रेस कार्यकर्त्यांनी पेडणे वीज कार्यालयाचे सहाय्यक अभियंते वाटू सावंत यांची भेट घेऊन चर्चा केली.

यावेळी काँग्रेसचे सरचिटणीस जितेंद्र गावकर, काँग्रेस गटाध्यक्ष कृष्णा नाईक तसेच उदय महाले, राकेश स्वार, शेखर पेडणेकर आदी उपस्थित होते.जितेंद्र गावकर यांनी सांगितले की, वर्षभरापूर्वीही आम्ही याच तक्रारींसाठी या कार्यालयात आलो होतो .

आजही तीच परिस्थिती आहे. कृष्णा नाईक यांनी सांगितले की, वीज खंडित झाल्यावर लोक आम्हाला विचारतात. लाईनमनना विचारले असता त्यांच्याकडून सहकार्य मिळत नाही, असेही त्यांनी नमूद केले. उदय महाले, राकेश स्वार, शेखर पेडणेकर आदींनीही या वेळी समस्या मांडल्या.

तांत्रिक समस्या : साहाय्यक अभियंते

सहाय्यक अभियंते वाटू सावंत यांनी सांगितले की, पावसाळ्याच्या सुरुवातीला खांबावरील इन्सुलेटरमध्ये पंक्चर होण्याचे प्रकार घडतात. दोष सहजासहजी सापडत नाही, त्यामुळे त्यात वेळ लागतो. तसेच इन्सुलेटर विद्युतभारित करण्यासाठीही अधिक वेळ जातो.

परिणामी अशा तांत्रिक कारणांमुळे लगेच वीजपुरवठा सुरळीत करता येत नाही.

हणखणे गावाचा वीजपुरवठा साळ–डिचोली येथून होतो. हणखणेतील वीजपुरवठा खंडित झाल्यास आम्ही पेडणेहून या भागाला वीजपुरवठा देतो. मात्र त्या दिवशी पेडणेतील वीजपुरवठाही कमी असल्याने तो देता आला नाही.

आंदोलकांपेक्षा पोलिस जास्त

पेडणे वीज कार्यालयावर मोठा मोर्चा काढण्यात येईल, अशी घोषणा झाल्यामुळे कार्यालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात मोर्चाऐवजी केवळ ठराविक लोकच उपस्थित राहिल्याने आंदोलकांपेक्षा पोलीस अधिक असल्याचे चित्र दिसून आले.

वीज केंद्रासाठी जागेचा शोध

हसापूर, हणखणे व इब्रामपूर या भागासाठी स्वतंत्र वीज केंद्राची आवश्यकता आहे. या केंद्रासाठी गेल्या दोन वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. पंचायत स्तरावर जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, परंतु अद्याप योग्य जागा उपलब्ध होऊ शकलेली नाही, असे सहाय्यक अभियंते वाटू सावंत यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT