Sadetod Nayak
Sadetod Nayak Dainik Gomantak
गोवा

Sadetod Nayak : गोंयकारपण हरवण्यास गोमंतकीयच जबाबदार : ‘सडेतोड नायक’

दैनिक गोमन्तक डिजिटल

गोव्याची अस्मिता, पारंपरिक अस्‍तित्‍व जपण्यास राजकीय पातळीवर अपयश आले आहे. सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय आघाड्यांवर होणाऱ्या अवमूल्‍यनाला गोवेकरच जबाबदार आहेत, असे मत तरुण विचारवंतांनी व्यक्त केले.

सोमवारी गोवा घटकराज्‍य दिनाच्‍या पूर्वसंध्‍येला ‘गोमन्‍तक’चे संपादक संचालक राजू नायक यांनी ‘सडेतोड नायक’ या कार्यक्रमात ‘गोवा-काल, आज’ या विषयावर संवाद साधला.

यावेळी गोवा विद्यापीठाचे व्याख्याते युगांक नाईक म्हणाले, "गोवा स्‍वतंत्र झाला, घटक राज्‍याचा दर्जा मिळाला त्‍याला 36 वर्षे झाली; परंतु आपण ज्‍या उद्देशाने वाटचाल केली, त्‍यात किती यशस्‍वी झालो आहोत, याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. मला वाटते की, आपल्याला आधुनिकतेची संकल्पनाच समजलेली नाही. गोव्यात आता समाज, राजकारण, अर्थकारण या क्षेत्रांत ज्या पद्धतीने संघटन व्हायला हवे होते, त्याप्रमाणे काम झालेले नाही."

धेंपे महाविद्यालयाचे व्याख्याते प्रजल साखरदांडे म्हणाले, "गोव्याला स्‍वतंत्र राज्याचा दर्जा मिळाल्यानंतर काही सकारात्मक गोष्टी आपण साध्य केल्या आहेत; परंतु त्याचवेळी भ्रष्टाचार, पक्षांतर, कामगारांचा वाढता ओघ, गोव्याच्या पर्यावरणाचा ऱ्हास यासारख्या नकारात्मक गोष्टी गोव्याला राज्याचा दर्जा मिळाल्यानंतर वाढल्या आहेत."

लेखक तथा ज्‍येष्‍ठ पत्रकार अलेक्झांडर बार्बोझा म्‍हणाले, "देशभरात राज्यांची निर्मिती भाषेच्या आधारावर झाली आणि त्याच धर्तीवर गोव्यालाही राज्याचा दर्जा मिळाला. गोव्याला राज्यत्व मिळाल्यानंतर सर्वच क्षेत्रांत काही चांगल्या आणि वाईट गोष्टी घडल्या."

पर्यावरणीय कार्यकर्त्या सेसिल रॉड्रिगीज म्‍हणाल्‍या, "गोवा हे छोटे व स्‍वतंत्र राज्‍य असूनही केंद्र सरकारचा दबाव जाणवतो. विकासाच्‍या नावाखाली गोव्यात निसर्गाची मोठी हानी होत आहे. निसर्गाचा मोठ्या प्रमाणावर विनाश होत आहे. गोव्यात शाश्वत विकास होत नाही."

लोक कंटाळले!

अखेरीला युगांक म्‍हणाले, "आपल्‍याला आधुनिकतेची कल्पना समजण्यात अपयश आले आहे. गोव्यातील लोक आता आंदोलनांना कंटाळले आहेत. गोव्याच्या दयनीय अवस्थेला गोवावासीच जबाबदार आहेत. उत्तम लोकं सत्तेत आली पाहिजेत. जेव्हा आपण मतदान करतो आणि जेव्हा आपण सामाजिक क्षेत्रात असतो तेव्हा आपण वेगळ्या पद्धतीने विचार करतो. या दोन्ही गोष्टी एकत्र असायला हव्‍यात, असाही सूर व्‍यक्‍त झाला."

युगांक नाईक

मुक्तीनंतर प्रादेशिक पक्षाला सत्तेत आणणारे गोवा हे दुसरे राज्य होते; पण ८०च्या दशकात गोव्यात राष्ट्रीय पक्ष मजबूत होऊ लागले. गोव्याच्या हिताचा आणि त्याच्या वेगळेपणाचा विचार न करणारे राजकीय नेते निवडून येणे हे अपयश आहे, असे युगांक म्‍हणाले.

प्रजल साखरदांडे

गोवा घटकराज्य झाल्यानंतर गोव्यात आपणास भ्रष्टाचार, पक्षांतर आणि खराब राजकारण पाहायला मिळाले. ही दुर्दैवाची बाब आहे. भविष्‍यात हे चित्र बदलायला हवे, असे प्रजल म्‍हणाले.

अलेक्झांडर बार्बोझा

भ्रष्ट लोक सत्तेत येणे हे गोव्यातील राजकीय अपयश आहे. गोव्यावरील कर्ज आता २५,००० कोटी झाली आहे. पुढील पाच वर्षांत आम्हाला अधिक कर भरावा लागेल. प्रत्येक सरकार आर्थिक धोरणांबाबत कमकुवत ठरले आहे, असे बार्बोझा यांनी सांगितले.

सेसिल रॉड्रिगीज

गोव्यातील पायाभूत सुविधा चांगल्या असत्या तर गोमंतकीय बाहेर गेले नसते; परंतु अनेक गोंयकार कामानिमित्त परदेशात गेले. भ्रष्टाचार आणि गोव्याच्या निसर्गाच्या विध्वंसामुळे लोक गोव्यातून बाहेर पडत आहेत, असे सेसिल म्‍हणाल्‍या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT