Sanquelim Harvalem Little Girl Swing Accident Dainik Gomantak
गोवा

Sanquelim: झोपाळ्यावर खेळताना दोरीचा बसला मानेला फास, अडीच वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

Sanquelim Little Girl Swing Death: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मुलीचे नाव आराध्या इंगळे असे असून हे कुटुंबीय मूळचे कर्नाटक येथील आहे. सध्या ते वरचे हरवळे-साखळी येथे राहतात.

Sameer Panditrao

साखळी: वरचे हरवळे-साखळी येथे भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या एका कुटुंबातील अडीच वर्षांच्या मुलीचा घराबाहेर बांधलेल्या झोपाळ्यावर खेळताना गळफास लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवार, ३ मे रोजी संध्याकाळी घडली.

डिचोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मुलीचे नाव आराध्या ज्ञानेश्वर इंगळे असे असून हे कुटुंबीय मूळचे कर्नाटक येथील आहे. सध्या ते वरचे हरवळे-साखळी येथे भाड्याच्या घरात राहतात.

घराबाहेर बांधलेल्या कपड्याच्या झुल्यावर आराध्या ही तिचा मोठा भाऊ आणि इतर लहान मुलांसोबत खेळत होती. त्यावेळी तिच्या मानेला या झोपाळ्याच्या दोरीचा फास बसला. त्यात ती बेशुद्ध पडल्याने तिला लागलीच साखळी सरकारी आरोग्य केंद्रात नेण्यात आले.

मात्र, तेथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी डिचोलीचे पोलिस उपनिरीक्षक विकेश हडफडकर यांनी पंचनामा केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Muhurat: गोव्यात धाकटी दिवाळी कधी? प्रदोष काळ ठरू शकतो मोठा 'अडथळा' तारखांचा गोंधळ संपवा; अचूक मुहूर्त वाचा

Jasprit Bumah Angry: "मी तुम्हाला बोलवलं नाहीय..." मैदानात साधा दिसणारा 'जस्सी' पापाराझींवर का चिडला? पाहा Viral Video

Rain In Goa: दिवाळीच्या पहिल्या आंघोळीपर्यंत पडणार पाऊस; गोव्यात पाच दिवस यलो अलर्ट

Goa Live Updates: आगरवाड्यात 25 रोजी आकाशकंदील स्पर्धा

IND vs AUS: रोहित, विराट कोहलीचा अखेरचा ऑस्ट्रेलिया दौरा? पॅट कमिंसने व्यक्त केला अंदाज

SCROLL FOR NEXT