Goa Harmal Beach Dainik Gomantak
गोवा

Goa Police: गोवा किनारी भागातील चालण्याऱ्या वेश्या व्यवसाय रोखण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान

Goa Police: गोव्यातील सध्या हरमल किनारी भागात पेडणे पोलिस रात्री ते पहाटेपर्यंत गस्त घालत आहेत.

दैनिक गोमन्तक

Goa Police: हरमल किनारी भागात खुलेआम चाललेल्या वेश्या व्यवसायामुळे पेडणे पोलिसांची झोप उडाल्याचे दिसत आहे. सध्या किनारी भागात पोलिस रात्री ते पहाटेपर्यंत गस्त घालत आहेत. त्यामुळे भविष्यात या गैरव्यवहारावर नियंत्रण मिळेल, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

बायणा येथील कुप्रसिद्ध असलेली वेश्यावस्ती मागच्या सरकारने बंद पाडल्यानंतर त्या व्यवसायाशी संबंधित महिला-युवती विखुरल्या गेल्या. काल मांद्रे मतदारसंघातील किनारी भागात जर फेरफटका मारला, तर मोठ्या प्रमाणात विविध राज्यातील युवती-महिला वेश्याव्यवसाय खुलेआम करत असल्याचे चित्र दिसत असल्याने पेडणे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

मांद्रे मतदारसंघातील किनारे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत; पण आता ड्रग्स, वेश्याव्यवसाय, अमलीपदार्थ, ध्वनिप्रदूषण आदींमुळे बदनाम होत आहेत. याला वेळीच आवर घातला नाही तर भविष्यात याचा परिणाम मोठ्या प्रमाणात पर्यटकांवर होईल. त्यामुळे स्थानिक आणि बिगर गोमंतकीय व्यावसायिकांच्या आर्थिक व्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो.

भाड्याच्या खोलीत व्यवसाय

हरमल किनारी भागात मोठ्या प्रमाणात खुलेआम वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे काही नागरिकांनी सांगितले. रात्री आठनंतर सुरू होणारा हा व्यवसाय पहाटे चारपर्यंत बिनधास्त चालतो. या व्यवसायात गुंतलेल्या महिला थेट किनारी भागात असलेल्या रेस्ट हाऊस, गेस्ट हाउस किंवा भाड्याने घेऊन रहात असलेल्या खोलीमध्ये हा व्यवसाय करतात. पोलिसांनी या ठिकाणांचा आवश्यक तपशील व माहिती गोळा करणे आवश्यक आहे.

किनारी भागात पहाटेपर्यंत गस्त

हरमल किनारी भागात सुरवातीला नायजेरियन महिला-युवतींकडून स्वखुशीने वेश्या व्यवसाय सुरू होता. आता कोलकोता व दिल्ली भागातील काही महिला-युवतींचा यात सहभाग आहे. या गैरव्यवहारात काही रेस्टॉरंट, रेस्ट हाउसचालकांची हातमिळवणी असल्याचे दिसून येते. या प्रकाराबद्दल माध्यमातून आवाज उठविल्यानंतर पेडणे पोलिसांनी किनारी भागात पहाटेपर्यंत गस्त वाढवली आहे.

दत्ताराम राऊत, पोलिस निरीक्षक, पेडणे-

अशा प्रकाराला थारा दिला जाणार नाही. जे कोणी अशा गैरव्यवहारात अडकलेले आहेत, त्यांची नावे नागरिकांनी आणि स्थानिक आणि पोलिसांना द्यावी. त्यांचे नाव गुप्त राहिल. स्थानिकांच्या रेस्टॉरंटमध्ये किंवा स्थानिकांच्या खोल्या-हॉटेल्समधून हा व्यवहार चालत असल्याचा संशय आहे. किनारी भागात ज्या महिला युवतीच्या व इतरांच्या खोल्या भाडेपट्टीवर घेऊन वास्तव्य करतात, त्यांची पूर्ण माहिती पोलिसांना द्यावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Akshat Naik Death Case: 'अक्षत' मृत्यूप्रकरणी नव्याने तपास करा, वडिलांची पोलिसांत तक्रार, पुरावे लपविल्याचा आरोप

Monsoon Tourism: सोशल मीडियासाठी रिल्स, सेल्फीचा नाद घेतो जीव! पावसाळी पर्यटनाचा मुद्दा बनला जटिल; धारबांदोड्यात 17 धोकादायक स्थळे

Karapur Sarvan Sarpanch: कारापूर-सर्वण सरपंच निवडीसाठी मंगळवारी बैठक, बिंदिया सावंत यांचे नाव निश्‍चित तरी उत्सुकता

Goa Monsoon: पावसाचा 20 इंचांचा टप्पा पार, मध्यम स्वरूपाचा पाऊस कायम; रविवारी 1 इंच पावसाची नोंद

खरी कुजबुज: काँग्रेस व भाजप अंतर्गत वादाच्या भोवऱ्यात!

SCROLL FOR NEXT