Goa Liberation Day: संगीतकार रामानंद रायकर यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘गीत गोंयच्या अस्मितायेचे’ हा कोकणी संगीतमय कार्यक्रम गोवा मुक्तिदिनानिमित्त 18 डिसेंबर रोजी नवी दिल्ली येथे गोव्यातील कलाकारांतर्फे सादर करण्यात येणार आहे.
कला व संस्कृती खात्यातर्फे पुरस्कृत नवी दिल्ली येथील गोयंकारांचो एकवट, फादर आग्नेल इन्स्टिटयूट यांच्या सहयोगाने स्वरश्री गोवातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन होणार असून हा कार्यक्रम ज्येष्ठ कलाकारांचा सन्मान करण्याच्या परंपरेनुसार ज्येष्ठ पखवाजवादक मलबाराव सरसदेसाई यांच्या स्मृतीस अर्पण केला आहे.
या कार्यक्रमाचे निवेदन लेखन पूर्णानंद च्यारी यांचे आहे. गोव्यातील प्रस्थापित कलाकार मंगेश शेट्ये, दिघेश पै आंगले, दीप्ती शेणवी कुंडईकर हे गायन करणार आहेत. यावेळी शैलेश साळगावकर, अनुप गुरव, साईराज केरकर, राजेंद्र परब, नवसो नाईक, जितेंद्र तांडेल हे कलाकार संगीताची साथ देणार आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.