Harindra singh sunburn X
गोवा

Sunburn Festival: 'विरोध‌‌ करणारे नंतर वेगवेगळ्या मागण्या करतात'; सनबर्नच्या संस्थापकांनी केले खळबळजनक आरोप

Goa Sunburn 2024: सनबर्नला केला जाणारा विरोध हा प्रसिद्धीच्‍या सोसामुळे होतो. विरोध‌‌ करणारे नंतर दूरध्वनी करून वेगवेगळ्या मागण्याही करतात, असे वक्‍तव्‍य सनबर्नचे‌ संस्थापक, प्रवर्तक हरिंद्रसिंह यांनी केले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Harindra Singh founder of Sunburn alleges opposition to festival

पणजी: सनबर्नला केला जाणारा विरोध हा प्रसिद्धीच्‍या सोसामुळे होतो. विरोध‌‌ करणारे नंतर दूरध्वनी करून वेगवेगळ्या मागण्याही करतात, असे वक्‍तव्‍य सनबर्नचे‌ संस्थापक, प्रवर्तक हरिंद्रसिंह यांनी केले आहे. त्‍यानंतर राज्यभरात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. सत्ताधारी तुंबड्या भरू पाहात आहेत आणि सनबर्नचे आयोजक याचे खापर जागरूक नागरिकांवर फोडू पाहात आहेत, अशी टीका होऊ लागली आहे.

हरिंद्रसिंह यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत उपरोक्‍त वक्तव्य केल्यानंतर अनेकांनी त्याबद्दल तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. सनबर्नच्या मुख्य महोत्सवाच्या ठिकाणी आणि आसपास तगडा पोलिस बंदोबस्त असतो. त्यासाठी पोलिसांचे शुल्क म्हणून ७० ते ८० लाख रुपये आयोजक अदा करतात. तरीही अमली पदार्थ व्यवहार होत असतील तर त्याला आयोजक जबाबदार कसे, असा प्रश्न हरिद्रसिंह यांनी उपस्थित करून सनबर्नमुळे ज्या काही वाईट गोष्टी होत असल्याची चर्चा आहे, त्याचे खापर सरकारवरच फोडले आहे. यामुळे सरकारवर टीकेची झोड उठू लागली आहे. सत्ताधाऱ्यांनी आर्थिक फायद्यासाठी अशा गोष्टींकडे काणाडोळा करणे सुरू केल्याची चर्चा सुरू झाली आहे.

सनबर्न पुणे येथे तीन वर्षे आयोजित करण्यात येत होता. तत्कालीन पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनीच पुन्हा गोव्यात येण्याचे निमंत्रण दिले, असा गौप्यस्फोट हरिंद्रसिंह यांनी केला. त्‍यावर आजगावकर यांनी गोव्यामुळेच सनबर्नला नाव‌ मिळाले हे विसरू नका, असे ठणकावले आहे. सनबर्नला सातत्याने विरोध‌ करण्याची भूमिका घेणारे पेडण्याचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी हरिंद्रसिंह यांना अशी नंतर मागणी करणाऱ्या सनबर्न विरोधकांची नावे जाहीर करण्याचे आव्हान दिले आहे. सनबर्न धारगळ येथे होण्यावरून वाद‌ सुरू झाला आहे. स्थानिक पंचायतीने तात्पुरती (प्रोव्हीजनल) परवानगी दिली आहे. सनबर्नला सरकारी पातळीवरून परवानगी मिळाल्यास प्रसंगी आत घुसून महोत्सव बंद‌ पाडू, असे आमदार आर्लेकर यांनी म्हटले आहे. या साऱ्या पार्श्‍वभूमीवर हरिंद्रसिंह यांनी विरोधकांकडे बोट दाखविल्याने परिस्थिती चिघळण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

पैसे मिळाल्यास सरकार काहीही विकू शकते!

हरिंद्रसिंह यांचे पूर्ण वक्तव्य पाहिल्यास एका शब्दात प्रतिक्रिया देणे शक्य आहे. गोव्यातील हे सरकार निर्लज्ज असून पैसे मिळाल्यास ते कोणालाही आणि काहीही विकू शकते हेच त्यातून सिद्ध होते, असे गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई यांनी म्‍हटले आहे.

हरिंद्रसिंह यांनी जे वक्तव्य केले आहे, त्यात काही नवीन नाही. ते प्रत्येकवेळी असेच वक्तव्य करतात; कारण त्यांना सत्ताधारी पक्षाचा पाठिंबा आहे. आता त्यांनीच सांगितले ते बरे झाले की, आपल्याला भाजप सरकारातील मंत्र्याने आमंत्रण देऊन गोव्यात आणले.

वास्तविक हिंदू संस्कृतीचे गोडवे गाणाऱ्या भाजपने जर त्यांना आमंत्रण दिले असेल तर हिंदू संस्कृतीचे काय यावर विचार करावा लागेल. मी मंत्री असताना मी सनबर्नला पर्याय सांगितला होता. जर गोव्यात ईडीएम महोत्सव पाहिजेच असतील तर गोवा सरकारची स्वतःची मनोरंजन सोसायटी आहे.

या संस्थेला असे महोत्सव का आयोजित करता येत नाहीत? सध्या गोव्याचे सत्ताधारी मंत्री अशा महोत्सवाच्या माध्यमातून आपल्या तुंबड्या भरू पाहात आहेत आणि आयोजकांना हे माहीत असल्यामुळे त्यांचीही मजल अशी बेजबाबदार वक्तव्ये करण्याइतपत जाते, असे सरदेसाई म्हणाले.

लाभासाठी सत्ताधारी करतात काणाडोळा

सनबर्नच्या मुख्य महोत्सवाच्या ठिकाणी आणि आसपास तगडा पोलिस बंदोबस्त असतो. त्यासाठी पोलिसांचे शुल्क म्हणून ७० ते ८० लाख रुपये आयोजक अदा करतात. तरीही अमली पदार्थ व्यवहार होत असतील तर त्याला आयोजक जबाबदार कसे? असा प्रश्न हरिंद्रसिंह यांनी उपस्थित करून सनबर्नमुळे ज्या काही वाईट गोष्टी होत असल्याची चर्चा आहे, त्याचे खापर सरकारवरच फोडले आहे.

गोवा हे पर्यटनासाठी नंदनवन बनले असून सनबर्न महोत्सवामुळे पर्यटनाला वाव मिळाला. सनबर्नमुळे गोवा नाही, तर गोव्यामुळे सनबर्न प्रसिद्ध झाला, हे आयोजकांनी लक्षात ठेवावे. महोत्सवात ड्रग्सचा वापर होऊ नये, यासाठी सरकारने प्रयत्न करण्याची गरज आहे. यासाठी सरकारबरोबरच चाळीसही आमदारांनी प्रयत्न करायला हवेत.
बाबू आजगावकर, माजी पर्यटनमंत्री
सनबर्न आयोजक जे कोणी विरोधक आर्थिक मागणी करत असल्याचा आरोप करतात. त्यांची त्यांनी जाहीर नावे करावीत आणि पुरावे सादर करावेत. सनबर्न कुणाला हवा असेल, तर त्यांना करू दे; परंतु तो पेडणे मतदारसंघात होऊ देणार नाही. सनबर्न सुरू झाला तर तो उधळून लावण्याची क्षमता पेडणेवासीयांमध्ये असून मी त्यांचे नेतृत्व करेन.
प्रवीण आर्लेकर, आमदार, पेडणे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

Rashi Bhavishya 04 July 2025: प्रवासाचे योग, सामाजिक मान मिळेल; महत्वाची व्यक्ती भेटेल

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT