Goa Police News  Dainik Gomantak
गोवा

Goa Police News: गोव्यातील महिला PSI चा छळ; दोन पोलिस अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून घेतली स्वेच्छानिवृत्ती...

पोलिस निरीक्षक, एएसआयवर आरोप, पोलिस महासंचालकांना लिहिले पत्र

Akshay Nirmale

Goa Police News: बाणस्तारी अपघात प्रकरण तसेच गोवा विद्यापीठातील विद्यार्थिनीचा विनयभंग या प्रकरणातील पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेची चर्चा सुरू असतानाच आता खुद्द गोव्याच्या पोलिस दलातील अधिकारी असलेल्या महिलेच्याच छळाचे प्रकरण समोर आले आहे.

संबंधित महिला अधिकाऱ्याने या अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून स्वेच्छा निवृत्ती घेतली आहे. या प्रकरणी तिने पोलिस महानिरीक्षकांना पत्रही लिहिले आहे.

पोलिस उपनिरीक्षक असलेल्या या महिलेने वाहतूक पोलिस निरीक्षकासह एक सहाय्यक पोलिस निरीक्षकावर आरोप केले आहेत. गोव्यातील इंग्रजी प्रसारमाध्यमांनी याबाबतचे वृत्त दिले आहे.

हे दोघेही पुरूष अधिकारी किनारपट्टी भागात बेकायदेशीर कृत्यांमध्ये गुंतले असून कामात सतत तिचा छळ केल्याचा आरोप तिने केला आहे. याबाबत संबंधित महिलेने 29 ऑगस्ट रोजी राज्याचे पोलिस महानिरीक्षक ओमवीर सिंग यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.

तक्रारीत म्हटले आहे की, पीआय असलेला अधिकारी कोणत्याही कारणाशिवाय तिचा छळ करत होता. त्याने तिला ड्युटीवर हजर असतानाही गैरहजर असल्याचे दाखवले होते. ई-चलन मशीनच्या गैरवापराबद्दल प्रश्न विचारला तेव्हा तिला आणखी त्रास दिला गेला, असेही सांगितले जात आहे.

तर संबंधित एएसआयला पीआयने पाठीशी घातले. त्याच्या चुकांवर पांघरूण घातले, असेही या महिला अधिकाऱ्याने आरोप केला आहे. ई-चलनची तातडीने सखोल चौकशी करावी, अशी मागणीही तिने केली आहे.

चुकीची वागणूक मिळाल्याने ती अत्यंत निराश झाली आहे. पीआय आणि एएसआयच्या दबावामुळेच संबंधित महिला अधिकाऱ्याने व्हीआरएस घेतल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, एएसआयकडून राजकीय हितसंबंधांचा वापर इतर अधिकाऱ्यांना तसेच उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनाही दूर करण्यासाठी करत आहे, असा आरोपही करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Live: सांतिनेझ परिसरातील तिसवाडी येथे एफडीए मोहीम

Goa Crime: '32 तासांत एकाचा जीव जातोय, गुन्ह्यांची आकडेवारी भयानक पण शिक्षेचे प्रमाण कमी'; विधानसभेत सरदेसाईंचा हल्लाबोल

Goa Crime: 2 वर्षांत 256 देशी-विदेशी पर्यटकांबाबत गुन्‍ह्यांच्‍या घटना! मुख्‍यमंत्र्यांची माहिती; सर्वाधिक प्रकरणे चोरीची

Goa Vegetable Import: शेतीमालासाठी गोवा कर्नाटक, महाराष्‍ट्रावर अवलंबून! 20639 मेट्रिक टनची तफावत; कांदाबटाट्याची वाढली आयात

Liquor Seized: गोव्यात चेकनाक्‍यांवर 3.14 कोटींची दारू जप्‍त! मागच्या वर्षी मोठी कारवाई; मुख्‍यमंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT